Bribe Trap Saam tv
महाराष्ट्र

Bribe Trap: ठेकेदाराकडून बिल काढण्यासाठी लाच; एक लाखांचा पहिला हप्ता घेताना स्वच्छता निरीक्षकाला अटक

ठेकेदाराकडून बिल काढण्यासाठी लाच; एक लाखांचा पहिला हप्ता घेताना स्वच्छता निरीक्षकाला अटक

अजय दुधाणे

अंबरनाथ : अंबरनाथ पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकाला एक लाख रुपयांची लाच (Bribe) घेताना रंगेहाथ अटक (Ambarnath) करण्यात आली. विलास भोपी असे या स्वच्छता निरीक्षकाचे नाव असून ठेकेदाराचे बिल काढण्यासाठी त्याने ३ लाख ७० हजार रुपयांची लाच मागितली होती. (Tajya Batmya)

अंबरनाथ पालिकेत कुगन कन्स्ट्रक्शन नामक ठेकेदार काम करतो. या ठेकेदाराचे बिल काढण्यासाठी स्वच्छता निरीक्षक विलास भोपी यांनी ३ लाख ७० हजार रुपयांची लाच मागितली होती. तसेच यापैकी अर्धा ॲडव्हान्स म्हणून १ लाख ८५ हजार रुपये देण्यासाठी त्याने ठेकेदाराकडे तगादा लावला होता. त्यामुळे ठेकेदाराने (ACB) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली.

लाचलुचपत विभागाने अंबरनाथमध्ये सापळा रचत विलास भोपी याला ठेकेदाराकडून १ लाख रुपये घेताना रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी त्याच्याविरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कोठडीत ठेवण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणमध्ये अमिरेकन लढाऊ विमान कोसळलं, पायलटला पकडण्यासाठी बक्षीस केलं जाहीर, VIDEO

Fact Check: केंद्र सरकारची वर्क फ्रॉम होम योजना? महिलांना 25 हजार मानधन मिळणार?

Ashok Kharat: मुलानेच उघड केलं खरातचं हवाला कांड? चौकशीदरम्यान SIT ला सांगितली धक्कादायक माहिती

अवकाळी पावसाने वाजवले स्मार्ट सिटीचे तीनतेरा; स्मार्ट सिटी की 'नरक' सिटी, पुणेकरांचा संताप

Earthquake: दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला, नागरिक घाबरून घराबाहेर पळाले; VIDEO समोर

SCROLL FOR NEXT