Dhule Crime News: हॉटेलमधील स्वयंपाकी कारागिराचा खून; संशयित फरार

हॉटेलमधील स्वयंपाकी कारागिराचा खून; संशयित फरार
Dhule Crime News
Dhule Crime NewsSaam tv
Published On

दोंडाईचा (धुळे) : दोंडाईचा- नंदुरबार रस्त्यावरील वीज वितरण कंपनीच्या (Dondaicha) कर्मचाऱ्यांच्या क्वॉटर्ससमोरील हॉटेलमध्ये स्वयंपाकी कारागिराचा (Crime News) खून झाल्याची घटना सोमवारी (ता.८) घडली. नरेश लालचंद साहू (वय ५४) असे मृताचे नाव आहे. (Latest Marathi News)

Dhule Crime News
Sharad Pawar In Satara : शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार ? शिंदे- फडणवीस सरकारला शरद पवारांनी दिला माेलाचा सल्ला

धारदार दोन चाकूच्या सहाय्याने नरेश लालचंद साहू यांच्यावर शरीरावर अनेक ठिकाणी वार केले आहेत. रात्री दोनच्या सुमारास हॉटेलमधीलच संशयित कारागिराने खून केला असल्याचे प्रथमदर्शनी तपासात पोलिसांना (Police) संशय आहे. एक वर्षापासून हॉटेल मालकाने सागर छोटू निवाने (मलकापूर रा. दोंडाईचा) यांना भाडेतत्त्वावर हॉटेल चालवायला दिले आहे. गेल्या सात महिन्यांपासून मृत नरेश साहू स्वयंपाकी म्हणून कामास होता. नेहमी प्रमाणे मालक रात्री साडेअकराच्या सुमारास हॉटेलचे कामकाज आटोपून घरी गेले. हॉटेलमधील काही कामगार बाहेरील असल्याने ते हॉटेल मध्येच झोपतात.

Dhule Crime News
Sharad Pawar In Rayat Shikshan Sanstha : बदलत्या जगाचा रयत शिक्षण संस्थेने वेध घेतला, देशात नावलाैकिक वाढला : शरद पवार

एकजण फरार

हॉटेलमध्ये झोपणाऱ्या स्वयंपाकी, वेटर या तिघांपैकी एकजण फरार आहे. त्यावर पोलिसांचा संशय आहे. त्यांचे लोकेशन घेत पोलिस त्याच्या मागावर आहेत. मृत नरेश साहू, गणेश कोळी यांच्यात काही कारणास्तव भांडण सुरू होते. त्यात संशयित गणेश कोळी (रा. पाळधी ता. धरणगाव) याने नरेश साहू यांचा खून केल्याचे हॉटेलमधील एकाने हॉटेल मालक सागर निवाने यांना सांगितले. त्यानुसार सागर निवाने यांनी दोंडाईचा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित गणेश कोळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, सोमवारी सकाळी घटनेची पोलिसांना माहिती मिळताच शिरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी अन्साराम आगरकर, पोलिस निरीक्षक केलसिंग पावरा, पोलिस उपनिरीक्षक सचिन गायकवाड, शरद लेंडे दिनेश मोरे आदींसह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दुपारी श्र्वान पथक, ठसे तज्ज्ञ, फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com