Bageshwar Baba News Saam tv
महाराष्ट्र

Ambarnath Crime News: बागेश्वर बाबांच्या दरबारात चोरट्यांची चांदी! महिलेच्या गळ्यातून २ तोळ्यांची सोन्याची चैन चोरीला

Bageshwar Dham Sarkar Dhirendra Shastri News: अशी आणखी प्रकरणे समोर येण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे.

अजय दुधाणे

Ambarnath News: सध्या बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री वेगवेगळ्या कारणांमुळे चांगलेच चर्चेत आहेत. नुकताच अंबरनाथमध्ये सोमवारी त्यांचा कार्यक्रम झाला. अंबरनाथमधील या बागेश्वर बाबांच्या दिव्य दरबारात चोरट्यांची चांदी झाल्याचे समोर आले आहे. कारण यावेळी एका महिलेच्या गळ्यातून २ तोळ्यांची सोनसाखळी चोरून नेल्याची घटना समोर आली असून अशाच आणखी काही घटना समोर येण्याची शक्यता आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिर मैदानात बागेश्वर बाबांचा दिव्य दरबार सोमवारी पार पडला. या दरबारासाठी राज्यभरातून हजारो भाविक इथे दाखल झाले होते. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी हात साफ केल्याचे समोर आले आहे. या कार्यक्रमासाठी अंबरनाथच्या जावसई परिसरात राहणाऱ्या पुष्पा तिवारी आल्या होत्या. (Crime)

यावेळी कार्यक्रमादरम्यान त्यांच्या गळ्यातली दोन तोळ्यांची सोनसाखळी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. ही बाब लक्षात येताच तिवारी यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. तसेच अशी आणखी प्रकरणे समोर येण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, महिनाभरापूर्वी  मुंबईतल्या (Mumbai) मीरा रोड परिसरातही असाच बागेश्वर बाबांचा भव्य दरबार पार पडला होता. यावेळीही चोरांनी हात साफ केल्याच्या घटना घडल्या होत्या. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास ३६ महिलांनी मंगळसूत्र आणि सोन्याची चेन चोरी झाल्याची तक्रार यावेळी दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

SCROLL FOR NEXT