Ambarnath News Saamtv
महाराष्ट्र

Ambarnath Crime: बक्षिस वितरणापूर्वीच चोरट्यांनी केला हात साफ; आमदार केसरी बैलगाडा शर्यत स्पर्धेतून १०- १२ गदा केल्या लंपास

मलंगगड परिसरातील खरड गावात भाजपा (BJP) आमदाराने आमदार केसरी बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते.

Gangappa Pujari

अभिजित देशमुख, प्रतिनिधी...

Ambarnath News: अंबरनाथ मलंगगड भागात आयोजित करण्यात आलेल्या आमदार केसरी बैलगाडा शर्यतीमधून गदा चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. अंबरनाडमधील खरड गावात या बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. मात्र बक्षीस वितरणाच्या दरम्यान गदा चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मलंगगड परिसरातील खरड गावात भाजपा (BJP) आमदार गणपत गायकवाड यांच्या नावाने आमदार केसरी बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. मात्र स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या दरम्यान गदा चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे.

या चोरीनंतर आयोजकांनी चोरलेल्या गदा परत करण्याचे आवाहन केले होते. मात्र चोरटयांनी चोरलेल्या गदा परत न केल्याने आयोजकांच्या आवाहनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

बुधवारी मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या खरड गावात या बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. काकडवाल गावातील निलेश कान्हा पावशे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी बैलगाडा शर्यतीच्या स्टेजवरून दहा ते बारा गदा चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. या चोरीची सध्या परिसरात चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal : ओबीसी मेळावा; छगन भुजबळांची तोफ आज नागपुरात धडकणार | VIDEO

Voter List : मतदार यादीमध्ये मोठा घोटाळा, एकाच घरात तब्बल ४,२७१ मतदार

Latur Tourism : महाराष्ट्रातील 'हा' किल्ला फार कमी लोकांना माहित असेल, लातूरला जाऊन एकदा पाहाच

Maharashtra Live News Update: ऍलोपॅथिक डॉक्टर संघटनांचा आज संप, राज्यात 24 तास आरोग्य सेवा बंद

Sanjay Mishra : संजय मिश्राने मढ आयलंडमध्ये घेतलं लग्जरी अपार्टमेंट, किंमत वाचून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT