Ambadas Danve Saam Digital
महाराष्ट्र

Ambadas Danve : 'हे मोहोळ फक्त टोलनाक्यावर दगड मारण्यासाठी असतं'; अंबादास दानवेंचा राज ठाकरेंना टोला

Ambadas Danve On Raj Thackeray : बीडमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ताफा अडवल्यानंतर राज ठाकरेंनी विधानसभेला एकही सभा घेऊ देणार नाही असा इशारा दिला होता. त्यावर विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जहरी टीका केली आहे.

Sandeep Gawade

माझ्या वाट्याला जाऊ नका अन्यथा विधानसभा निवडणुकीत एकही सभा घेऊ देणार नाही, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटाला दिला होता. त्यावर आता ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. ज्या गावच्या बाबळी त्या गावच्या बोरी, असं म्हणतं. हे मोहोळ फक्त टोलनाक्यावर दोन दगड मारण्यासाठी असतं. हे मोहोळ ज्या सुपारी आहेत त्या वाजवण्यासाठी असतं, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, अशी हल्लाबोल राज ठाकरेंवर केला आहे.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर असून सध्या ते मराठवाड्यात आहेत. दरम्यान काल बीडमध्ये शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंचा ताफा अडवत गोंधळ घातला होता. त्यावरून आता ठाकरे विरुद्ध ठाकरे असा वाद निर्माण झाला आहे. राज ठाकरेंनी माझं मोहळ उठलं तर विधानसभेला एकही सभा घेता येणार नाही, असा इशारा दिला होता. तसंच मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं विधानसभेचं राजकारण लंपलं आहे, असा थेट आरोप केला होता.

त्यानंतर अंबादास दानवे यांनी अत्यंच तिखट प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेला असं करण्याची गरज नाही, उलट आरोप आम्हालाही करता येतो, तुम्हीच भाजप आणि शिंदे गट यांच्याआडून सगळं राजकारण करता, असं आम्ही म्हणायचं का? हा माझा सवाल आहे. माझं मोहळ उठल तर विधानसभेला सभा घेता येणार नाही असं राज ठाकरे म्हणाले आहेत, मात्र ज्या गावच्या बाबळी त्या गावच्या बोरी, हे मोहोळ फक्त टोलनाक्यावर दोन दगड मारण्यासाठी असतं. ज्या सुपारी आहेत ते वाजवण्यासाठी असतं,हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, असा टोला लगावला आहे.

जरांगेंच्या आडून विधानसभेसाठी ठाकरे , पवार कधीही राजकारण करणार नाहीत. असं कुठे असेल, तर ते सिद्ध करून दाखवावं. असे धंदे शिवसेना कदापि करणार नाही. मात्र राज ठाकरे यांनी अजित पवार कधीच जातीच राजकारण करणार नाही असं म्हटलं आहे. हा साक्षात्कार आता घडलेला आहे त्यांना. त्यांच्या मागच्या काळातल्या सर्व भूमिका पाहिलेल्या आहेत, त्याचं आपल्याला स्पष्टीकरण मिळेल. काल बीडमध्ये राज ठाकरेंचा ताफा अडवला ते शिवसैनिक जरूर होते. मात्र आंदोलन शिवसेनेचं नव्हतं. मराठा आंदोलनाच्या माध्यमातून त्यांचा ताफा अडवण्यात आला होता. सगळ्या पक्षांचे मराठा समाजाचे कार्यकर्ते त्या आंदोलनात होते, असही दानवे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT