Ambadas Danve SAAM TV
महाराष्ट्र

Ambadas Danve : शिंदेंची शिवसेना फक्त ५ दिवसांची, मी ठाकरेंसोबतच राहणार; अंबादास दानवे यांचं स्पष्टीकरण

Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha 2024 : मी नाराज असल्याच्या चर्चांना काहीच अर्थ नाही. शिंदेंची शिवसेना फक्त ५ दिवसांची आहे. मी ठाकरेंसोबतच राहणार. मी सर्वसामान्य शिवसैनीक आहे. माझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे.

Ruchika Jadhav

Lok Sabha Election :

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे दानवे शिंदे गटात प्रवेश करतील तसेच महायुतीकडून छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढतील अशाही चर्चा सुरू आहेत. मात्र या सर्व चर्चांवर अंबादास दानवेंनी स्वत: पडदा टाकला आहे.

मी नाराज असल्याच्या चर्चांना काहीच अर्थ नाही. शिंदेंची शिवसेना फक्त ५ दिवसांची आहे. मी ठाकरेंसोबतच राहणार. मी सर्वसामान्य शिवसैनीक आहे. माझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे अशा कोणत्याही चर्चांकडे लक्ष देऊ नये. गेल्या १० वर्षांपासून मी लोकसभेसाठी इच्छूक आहे. मी माझी इच्छा कधीच लपवून ठेवलेली नाही. हे पक्षप्रमुखांना देखील माहिती आहे, अशा शब्दांत दानवेंनी चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे.

माध्यमांशी संवाद साधताना पुढे त्यांनी म्हटलं की, ही सर्व चर्चा खोटी आहे. शिवसेना ठाकरे गटात कोणताही संभ्रम नाही. उद्धव ठाकरे व्यवस्थितपणे सर्वांची उमेदवारी जाहीर करत आहेत. काल दक्षिण मुंबईमधून अरवींद सावंत यांची उमेदवारी जाहीर केली. त्याआधी ८ ते १० दिवसांपूर्वी अमोल किर्तिकरांची उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच ओमराजेंसह काही उमेदवारांची नावे जाहीर करण्याचे काम सुरू आहे, असं दानवे म्हणाले.

तर पहिल्याच दिवशी गेलो असतो

मला जायचं असतं तर मी पहिल्याच दिवशी गेलो असतो. जनतेच्या काही कामांसाठी सत्ताधाऱ्यांशी आमचं फोनवर बोलनं होतं. सीट मिळणे किंवा न मिळणे याचा विचार करण्यापेक्षा संघटनेच्या विचाराने काम करणं असा माझा विचार आहे. प्रमुखांकडे काही गोष्टी मागण्याचा मला अधिकार आहे. मात्र ते जो नर्णय घेतील तो मला मान्य असेल, असंही दानवेंनी यावेळी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT