Amaravati Bajar Samiti Saam tv
महाराष्ट्र

Amaravati Bajar Samiti Election: अंगणवाडी सेविकेचा मुलगा बनला सभापती; सभापती, उपसभापती बिनविरोध

अंगणवाडी सेविकेचा मुलगा बनला सभापती; सभापती, उपसभापती बिनविरोध

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

अमरावती : अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काँग्रेसने १८ पैकी १८ जागा मिळवत एक हाती सत्ता मिळविली. आज (Amaravati) अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Bajar Samiti) सभापती निवडणुकीमध्ये अंगणवाडी सेविका व शेतकऱ्यांचा मुलाला माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सभापती बनवले. हरीश मोरे यांची सभापती पदी निवड झाली आहे. (Latest Marathi News)

उत्पन्नाने विदर्भातील दुसऱ्या क्रमांकाची बाजार समिती असलेल्या अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ३५ वर्षीय युवा शेतकरी अंगणवाडी सेविकेच्या मुलाला सभापती पदाचा बहुमान मिळाल्याने जिल्ह्यात एकच चर्चा सुरू झाली आहे. यावेळी एक शेतकरी अंगणवाडी सेविकेचा मुलगा सभापती होत असताना आनंद होत असल्‍याची प्रतिक्रिया माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.

उपसभापती पद ठाकरे गटाला

अमरावती बाजार समितीवर निर्विवाद वर्चस्‍व राखत सभापती पद (Congress) कॉंग्रेसने राखले. यात हरीश मोरे यांची सभापती तर उपसभापती पदी शिवसेनेचे भैय्यासाहेब निर्मळ यांची निवड करण्यात आली. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व नेते कार्यकर्ते यांनी एकच जल्लोष केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : शिंदेंसेनेच्या नेत्याला अटक, घराबाहेर सापडली ड्रग्सने भरलेली बॅग; राजकारणात खळबळ

Pune Bank Scam : पुण्यात बँकेत महाघोटाळा! तब्बल ३४.७७ कोटींचा दरोडा; पोलिसांच्या कारवाईने सहकार क्षेत्रात खळबळ

Maharashtra News Live Update: एमपीएससी सचिवांना काळे फासल्या प्रकरणी ३ जणांना अटक

3 Gram Gold Mangalsutra: 3 ग्रॅम सोन्यामध्ये महिलांसाठी सुंदर मंगळसूत्र; पाहा लेटेस्ट 5 डिझाइन्स

Manoj Jarange: ठरलं! जरांगे मुंबईत येण्यावर ठाम, उद्या ठरणार मोर्चाचा मार्ग अन् ठिकाण

SCROLL FOR NEXT