अमर घटारे
Amravati News: अमरावतीच्या अचलपूरमधून मोठं वृत्त हाती आलं आहे. अचलापुरात शासकीय आश्रमशाळेत पोहे खाल्ल्याने २५ ते ३० विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. अचलपूर तालुक्यातील वडगाव फत्तेपूर येथील शासकीय विद्यालयात (आश्रमशाळा) हा प्रकार घडला आहे. विषबाधा झालेल्या विद्यार्थिनींना शाळेजवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीमधील अचलपूर तालुक्यातील वडगाव फत्तेपूर येथील शासकीय विद्यालयातील (आश्रमशाळा) विद्यार्थिनींनी सकाळी पोहे खाल्ले. त्यानंतर २५ ते ३० विद्यार्थिनींची तब्येत बिघडली. आश्रमातील विद्यार्थिंनीची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले.
नेमकं काय घडलं?
आश्रमशाळेतील विद्यार्थिनींनी सकाळी पोहे खाले. पोहे खाल्लेल्या मुलींना एक-दोन तासांनी मुलींना त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना तातडीने अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
परभणीत ४५ जणांना झाली होती विषबाधा
दरम्यान, परभणीतील सोनपेठ तालुक्यातील मौजे खपाट पिंपरी येथे तेरवीच्या जेवणाचा कार्यक्रमात 45 जणांना विषबाधा झाली होती. या घटनेनंतर दोन जण गंभीर झाल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान काही जणांना किरकोळ आजार राहिल्याने त्या रुग्णांना औषधोपचार देऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.