amalner police charged 25 from obc community for rasta roko andolan saam tv
महाराष्ट्र

बीड : ओबीसी बांधवांचे रास्ता राेकाे आंदाेलन, महिलांसह 25 आंदाेलकांवर गुन्हा दाखल

amalner police charged 25 from obc community for rasta roko andolan : सरकारने प्रा. लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बीड जिल्ह्यातील ओबीसी समाजाने दिला आहे. या आंदोलनाची धग दिवसेंदिवस वाढत असल्याने आता प्रशासनापुढे नवा पेच निर्माण झाला आहे.

विनोद जिरे

प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये ओबीसी बांधवांनी गेल्या दाेन दिवसांपासून वेगवेगळ्या पद्धतीचे आंदाेलन छेडले. या आंदाेलनाला तालुक्यांतील गावा गावांतून उत्तम प्रतिसाद मिळाला. दरम्यान बीड- अहमदनगर- कल्याण महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्याने अमळनेर पोलिसांनी 25 आंदाेलकांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये 5 महिलांचा समावेश आहे.

ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी प्रा. लक्ष्मण हाके यांनी आंदाेलन छेडले आहे. या आंदाेलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी बीड येथील विविध तालुक्यात ओबीसी समाज आंदाेलन करीत आहे. आज हाके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेवराई तालुक्यातील तलवाडा येथून ट्रॅक्टर रॅली वडीगोद्रीकडे रवाना झाली. या रॅली मध्ये शेकडो ओबीसी बांधव सहभागी झालेत.

ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका, या मागणीसाठी अहमदपूर- अहमदनगर राष्ट्रीय मार्गावर पिंपळगाव घोळवे येथे ओबीसी बांधवांनी एकत्रित येत रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आंदाेलकांनी रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोको केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्याचा अकाली मृत्यू; मनोरंजन विश्वावर शोककळा

Maharashtra Politics: भाजप प्रवक्त्या मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीश, आरती साठेंच्या नेमणुकीवर पवारांचा गंभीर आरोप

Onion : चाळीत ठेवलेला ७०० क्विंटल कांदा जाळला; सात लाख रुपयांचे नुकसान, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

Maharashtra Live News Update : नवी मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराविरुद्ध स्थानिकांचे आणि माजी नगरसेवकांचे साखळी उपोषण

धावत्या एक्स्प्रेसच्या टॉयलेटमध्ये बलात्कार झाल्याचं तरुणीनं सांगितलं, पण CCTV फुटेजमुळं हादरवणारं सत्य आलं समोर

SCROLL FOR NEXT