Buldhana Breaking: बुलढाण्यातील सर्व शाळा बंद ठेवा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश Saam TV
महाराष्ट्र

Buldhana Breaking: बुलढाण्यातील सर्व शाळा बंद ठेवा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी शाळा बंद ठेवण्यात याव्यात आणि विद्यार्थ्याचे शिक्षण Online पद्धतीने घ्याव्यात असे आदेश जिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी दिले आहेत.

संजय जाधव, साम टीव्ही

कोविड 19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बुलढाणा जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचा निंर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी शाळा 31 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्यात याव्यात व विद्यार्थ्याचे शिक्षण ऑनलाईन (Online) पद्धतीने घ्याव्यात असे आदेश जिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी दिले आहेत.

मागील आठवडाभरापासून राज्यातील कोरोना (Corona) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान मुंबई, ठाणे, नवीमुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील शाळा बंद केल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती बुलढाण्यातील (Buldhana) वाढते कोरोना रुग्ण पाहता जिल्ह्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: या 3 सवयी असणाऱ्या व्यक्तीपासून कायम दूर राहा, आयुष्यात होईल पश्चात्ताप

Sillod News : सत्तारांना पाडण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद, पाहा VIDEO

Maharashtra News Live Updates: PM नरेंद्र मोदी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड

IND vs SA: भारत- दक्षिण आफ्रिका सामन्याची वेळ बदलली? रात्री किती वाजता सुरु होणार सामना?

BKC Metro Fire: बीकेसी मेट्रो स्टेशनला आग; आगीमुळे सर्व मेट्रो थांबवल्या

SCROLL FOR NEXT