police arrested youth congress secreatary in alibaug
police arrested youth congress secreatary in alibaug saam tv
महाराष्ट्र

प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीसासह महिला साथीदार अटकेत; अलिबाग पाेलिसांची कारवाई

साम न्यूज नेटवर्क

- राजेश भोस्तेकर

अलिबाग : व्यवसायात नुकसान करणाऱ्याला विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा नादात अलिबागमधील राजकीय हस्ती असणाऱ्या एका वकिलाला आणि त्याच्या दोन साथीदारांनाच जेलची हवा खाण्याची वेळ आली आहे. अलिबाग पोलीस ठाण्यात वकीलासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून वकिलाच्या दोन साथीदारांना न्यायालयाने १४ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी मुख्य सुत्रधार असलेले वकीलास अटक केली असता त्याच्या छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल केले आहे. संबंधितास मेडिकल कस्टडीत घेण्यात आलेले आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली. (police arrested youth congress secreatary in alibaug)

अलिबाग (alibaug) पोलिसांनी (police) सायबर सेलच्या माध्यमातून ह्या गुन्ह्याचा (cyber crime) योग्य तपास लावून आरोपींना जेरबंद केले आहे. अलिबाग पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक शैलेश सणस हे पुढील तपास करीत आहेत.

अलिबागमधील उमेश मधुकर ठाकूर हा प्रदेश युवक काँग्रेसचा सरचिटणीस (youth congress secreatary) असून व्यवसायाने वकील आहे. त्याचा रेती व्यवसायही आहे. ऍड ठाकूर यांच्या रेती व्यवसायबाबत पेण येथील काशीनाथ ठाकूर यांनी विविध कार्यालयात रेतीबाबत तक्रार अर्ज दाखल केले असल्याने ठाकूर यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. याचा राग हा ठाकूर यांच्या मनात होता. काशिनाथ ठाकूर यांना अद्दल घडविण्यासाठी ऍड ठाकूर यांनी त्यांना अडकविण्यासाठी प्लॅन केला. या प्लॅनमध्ये मनीषा चोरडेकर (शिवाजी नगर, अलिबाग) आणि शुभम गुंजाळ (बुरुम खाण, अलिबाग) यांना हाताशी धरले.

ऍड ठाकूर यांनी काशीनाथ ठाकूर यांच्या नावाने खोटे फेसबुक खाते तयार केले. काशीनाथ ठाकूर यांच्या नावाच्या खोट्या खात्याद्वारे मनीषा चोरडेकर यांच्या फेसबुक खात्यावर १६ नोव्हेंबरला अश्लील संदेश आणि चित्रफीत पाठविली. त्यानंतर मनीषा यांच्यासमवेत अलिबाग पोलीस ठाण्यात काशीनाथ ठाकूर यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली. महिलेची तक्रार असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गुन्ह्याचा तपास त्वरित करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांना दिल्या. त्यानुसार सणस यांनी सायबर सेलची मदत घेऊन फेसबुक कंपनीशी संपर्क साधत तपास सुरु केला. यामध्ये पाेलिसांना शुभम गुंजाळ हा या प्रकरणात असल्याचे दिसून आले.

शुभमची कसून चौकशी केल्यानंतर पाेलिसांपुढं ऍड उमेश ठाकूर याचा चेहरा समाेर आला. त्यानुसार ऍड उमेश ठाकूर, मनीषा चोरडेकर, शुभम गुंजाळ या तिघांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पाेलिसांनी या तिघांनाही अटक केली आहे. मनीषा आणि शुभम यांना १४ जानेवारी पर्यत पोलीस कोठडी मिळाली आहे. ऍड उमेश ठाकूर हे जिल्हा रुग्णालयात उपचार घेताहेत अशी माहिती शैलेश सणस, पोलीस निरीक्षक, अलिबाग यांनी दिली.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

Maharashtra Politics: 'नावं द्या त्या पोलिसांना बघतो मी', उद्धव ठाकरेंनी भरला पोलिसांना दम; मुलुंडच्या राड्यावरून ठाकरेंचा संतापले

Kalyan Crime News : यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर ज्वलनशील पदार्थ लुटलं, कल्याणमधील घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT