Alibag : लाचखोर जिल्हा उपनिबंधक आणि लिपिकाला दोन दिवसांची पोलीस कोठडी राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

Alibag : लाचखोर जिल्हा उपनिबंधक आणि लिपिकाला दोन दिवसांची पोलीस कोठडी

सोसायटी नोंदणी प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी 27 सप्टेंबर रोजी अलिबाग लाचलुचपत पथकाने सहकार संस्था विभागाचे जिल्हा उपनिबंधक गोपाळ माळवे आणि मुख्य लिपिक सुहास दवटे यांना अटक केली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

अलिबाग : सोसायटी नोंदणी प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी 27 सप्टेंबर रोजी अलिबाग लाचलुचपत पथकाने पकडलेल्या सहकार संस्था विभागाचे जिल्हा उपनिबंधक गोपाळ माळवे आणि मुख्य लिपिक सुहास दवटे यांना आज अलिबाग जिल्हा न्यायाधीश दुसरे आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश थत्ते यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही, 30 सप्टेंबर पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे देखील पहा :

सहकार संस्थेच्या कार्यालयातील जिल्हा उपनिबंधक गोपाळ माळवे आणि मुख्य लिपिक सुहास दवटे यांनी रोहा अष्टमी येथील एका सोसायटी नोंदणी प्रकरणाची पडताळणी करून प्रमाणपत्र देण्यासाठी 40 हजाराची लाच मागितली होती. तक्रारदार यांनी याबाबत अलिबाग लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून 27 सप्टेंबर रोजी माळवे आणि दवटे यांना लाच स्वीकारताना अटक केली. आज 28 सप्टेंबर रोजी माळवे आणि दवटे या दोघांना लाच लुचपत विभागाने अलिबाग जिल्हा न्यायालयात हजर केले.

सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ऍड.भूषण साळवी यांनी माळवे याचे नाशिक येथील एका बँकेत लॉकर आहे. तसेच इतर कार्यालयातील प्रकरणात आर्थिक देवाणघेवाण प्रकार झाले आहेत का असा युक्तिवाद करून दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. आरोपी पक्षातर्फे ऍड.प्रवीण ठाकूर यांनी युक्तिवाद केला. दोन्ही पक्षाचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश थत्ते यांनी माळवे आणि दवटे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे पुढील तपास लाच लुचपत विभागाकडून सुरू आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: काहींना कामात यश मिळेल तर काहींना प्रवास जपून करावा लागेल, पाहा साप्ताहिक राशीभविष्य

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

SCROLL FOR NEXT