Alibag Crime News Saam tv
महाराष्ट्र

Alibag Crime News : बियरची बाटली फुटल्याच्या आवाजावरून वाद; अलिबाग समुद्र किनाऱ्यावर एकाचा खून

Alibag news : अलिबाग येथील समुद्र किनाऱ्यावर अनेकजण फिरण्यासाठी येत असतात. त्यानुसारच मितेश पाटील आणि त्‍याचा मित्र प्रथमेश हे दोघे अलिबाग समुद्र किनारी फिरण्यासाठी

Rajesh Sonwane

सचिन कदम 
अलिबाग
: अलिबागच्या समुद्र किनारी काल रात्री किरकोळ कारणातुन निर्माण झालेल्या वादात एका तरुणाचा खून झाल्याची घटना घडली आहे. समुद्र किनाऱ्यावर दारू पीत असताना बाटली फुटल्याच्या कारणातून हा वाद उद्भवला होता. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. 

पेण येथील रहिवाशी मितेश पाटील असे सदरच्या घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान (Alibag) अलिबाग येथील समुद्र किनाऱ्यावर अनेकजण फिरण्यासाठी येत असतात. त्यानुसारच मितेश पाटील आणि त्‍याचा मित्र प्रथमेश हे दोघे अलिबाग समुद्र किनारी फिरण्यासाठी आले असताना ते एका ठिकाणी बियर पीत बसले होते. यावेळी मितेशच्‍या हातातील बियरची बाटली खाली पडून फुटली. 

बियरची बाटली पडून फुटल्याने त्‍याचा आवाज झाला. यावेळी मितेश यांच्या बाजूलाच काहीजण दारू पीत बसले होते. बाटली फुटल्याचा आवाज आल्याने शेजारी दारू पिण्‍यासाठी बसलेल्‍यांना याचा राग आला. या कारणावरून त्‍यांनी मितेश व प्रथमेश याना शिवीगाळ करत वाद घालण्यास सुरवात केली. या वादामध्ये त्यांनी (Crime News) दोघांनाही मारहाण करण्‍यास सुरूवात केली. 

अधिक वाद नको म्हणून निघताच केला वार 

यावेळी अधिक वाद नको म्हणून मितेश आणि त्‍याचा मित्र तेथून जाण्यासाठी निघाले. ते जात असताना एकाने मितेश याच्‍या पोटावर आणि खांद्यावर धारदार शस्‍त्राने वार करून त्‍याला ठार मारले. घटनेची माहिती (Alibag Police) अलिबाग पोलिसांना मिळताच अलिबाग पोलीसांनी घटनास्‍थळी भेट देवून पंचनामा केला आहे. याप्रकरणी गुन्‍हा दाखल करून पाचही जणांना ताब्‍यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

Pune News: MPSC च्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, शेवटच्या चिठ्ठीतून धक्कादायक कारण समोर

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

SCROLL FOR NEXT