अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचा राजीनामा; चर्चांना उधाण जयेश गावंडे
महाराष्ट्र

अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचा राजीनामा; चर्चांना उधाण

अकोला  जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतिभा भोजने यांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकर यांच्याकडे त्यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जयेश गावंडे

अकोला - जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतिभा भोजने Pratibha Bhojane यांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष डॉक्टर Docator धैर्यवर्धन पुंडकर Dhairyavardhan Pundkarयांच्याकडे त्यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा Resignation सुपूर्द केला आहे. गत काही दिवसांपासून जिल्हा परिषदेत अध्यक्ष प्रतिमा भोजने यांच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत होती. Akola Zilla Parishad president resigns

हे देखील पहा -

याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सुद्धा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे एप्रिल महिन्यापासूनच जिल्हा परिषदेमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. परंतु मध्यंतरीच्या काळात खांदेपालटाच्या चर्चांना विराम लागला होता. दरम्यान 18 जुन रोजी अध्यक्ष प्रतिभा भोजने यांनी राजीनामा दिल्याची बाब समोर आली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. प्रतिभा भोजने यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्ताला वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकर यांनी दुजोरा दिला आहे.

दरम्यान, भोजने यांच्या राजीनाम्यामुळे चर्चांना उधान आले आहे. प्रतिभा भोजने ह्या भारिप बहुजन महासंघ अर्थात वंचित बहुजन आघाडीच्या भांबेरी सर्कलमधून निवडून आल्या आहेत. गत 29 वर्षे त्यांनी विविध प्रमुख पदांवर काम करत पक्षातील सभा संमेलन आंदोलन यामध्ये सक्रिय भाग घेतला आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा अंतिम निर्णय पक्षाचे सर्वेसर्वा अ‍ॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे घेणार आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धायरीचा पोस्टर बॉय! लग्न जुळवण्यासाठी जागोजागी पोलिसांचे बॅनर, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

राज्यात भाजपची मोठी रणनीती; युवकांना जोडण्यासाठी आखला मास्टरप्लान

शेतकरी कर्जमाफी परदेशी समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर; काय असणार कर्जमाफीचे नियम आणि अटी?

युद्ध पुन्हा पेटणार? ट्रम्पची शरणागती अमान्य; इराणनं शस्त्रसंधी फेटाळून लावली

Maharashtra News Live Update: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत माझे चांगले संबंध- खासदार अशोक चव्हाण

SCROLL FOR NEXT