AKOLA ILLEGAL GUTKHA FACTORY BUSTED: FDA SEIZES ₹50 LAKH STOCK IN MAJOR RAID Saam tv
महाराष्ट्र

Akola : अकोल्यात खळबळ! तुकाराम मुंढेंच्या पथकाची गुटखा कारखान्यावर धाड; ५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Akola FDA Raid News : अकोल्यात गुटखा कारखान्यावर FDA आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल ५० लाख रुपयांचा गुटखा, पान मसाला व कच्चा माल जप्त केला. तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Alisha Khedekar

  • अकोला MIDC मधील अवैध गुटखा कारखान्यावर FDA आणि पोलिसांची संयुक्त धाड

  • कारवाईत तब्बल ५० लाख रुपयांचा गुटखा, पान मसाला आणि कच्चा माल जप्त

  • FDA अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पार पडली

  • कारखान्याचा मालक गौरव शर्माविरोधात गुन्हा दाखल

अक्षय गवळी, अकोला

Akola MIDC FDA Raid On Illegal Gutkha Factory अन्न आणि औषध प्रशासन अधिकारी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून महाराष्ट्राचा कोपरा आणि कोपरा खणून काढला आहे. भेसळयुक्त पदार्थांपासून ते औषधांच्या गैरव्यवहारापर्यंत अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केली. अशातच आता FDA ने अकोल्यातील एका गुटख्याच्या अवैध कारखानावर छापा टाकत तब्बल ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील कारवाई सुरु आहे.या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासन विभागाला संबंधित कारखान्यात गुटखा बनवण्याचे काम चालू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे FDA अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने MIDC मधील गुटखा कारखान्यावर धाड टाकली.

MIDC पोलीस आणि FDA च्या संयुक्त धाडेत या कारखान्यात तब्बल ५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या कारखान्याचा मालक गौरव शर्माविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव शर्मावर मकोका अंतर्गत कारवाईची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारवाई दरम्यान फक्त गुटखाच नाही तर, पान मसाला, कच्चा माल आणि उत्पादनासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले.

अन्न व औषध प्रशासन विभागाने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा बेकायदेशीर उद्योगांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. या धाडीनंतर जिल्ह्यातील इतर अवैध गुटखा उत्पादक आणि विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून संबंधित यंत्रणांनी तपास अधिक तीव्र केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वसई-विरार महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावर फेरीवाल्यांचा ठिय्या

Datiya Bypoll : निवडणुकीत पराभव होताच भाजपचा मोठा निर्णय; अख्खी कार्यकारिणी बरखास्त, पक्षात खळबळ

संध्याकाळी टाईमपास खायला बनवा क्रिस्पी मखाना चिवडा; रेसिपी आहे एकदम सोपी

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

SCROLL FOR NEXT