Akola News: अकोला शहरातील पारस परिसरातील बाबूजी महाराज मंदिरात आरती सुरू असतानाच टिनशेडवर झाड कोसळून आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे हे झाड कोसळलं आणि टिनशेडखाली थांबलेले 40 ते 50 जण दबले गेले. तर या घटनेत 8 जण गंभीर जखमी आहेत. (Latest Marathi News)
अकोला जिल्ह्यात ९ एप्रिल रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. दरम्यान अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या पारस गावात बाबूजी महाराज संस्थान या संस्थांनमध्ये आरती सुरू होती.
मंदिराच्या परिसरात असलेल्या टिनाच्या शेड खाली दर्शनासाठी तसेच पावसापासून आपला बचाव करण्यासाठी रस्त्यावरील वाहन धारक असे एकत्रित ४५ पेक्षा अधिक लोक उपस्थित होते.
अचानक यादरम्यान मंदिराला लागून असलेलं भल मोठं कडूलिंबाचे झाड अचानक उन्मळून टिनाच्या शेडवर कोसळले. शेड खाली असलेले सर्व लोक या खाली दबल्या गेले.
या घटनेत आतापर्यंत ७ लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे. तर काही लोकांना सुखरूप बाहेर काढून वाचवण्यात आले आहे. यातील काही लोकांना हात-पायाला गंभीर दुखापत झाली असून जखमींचा आकडा २५ आहे.
यापैकी पाच जण गंभीर जखमी असल्याचे समजते. या सर्व जखमींवर अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच अकोल्याचे जिल्हाधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे त्यासह शोध बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं होते.
मृतांमध्ये अतुल आसरे (वय ३२ वर्ष, बाभूळगाव जि. अकोला), विश्वनाथ तायडे (वय ३५ वर्ष, सोनखेड), पार्वताबाई महादेव सुशील (वय ६५ वर्ष आलेगाव बाजार), भास्कर आंबीलकर (वय ६० वर्ष अकोला), उमा महेंद्र खारोडे (वय ५० वर्ष, भुसावळ) अशी मृत व्यक्तींची नावं असून काहींचे अद्याप नावे कळू शकले नाहीत. तरीही यातील मृतकांची अद्याप पर्यंत ओळख पटली नसून दोन्ही पुरुष असून त्यांची वय ३५ आणि ४५ अशी आहे.
अशी मिळणार मदत
या घटनेतील मृत व्यक्तीच्या नातेवाईकांसाठी रु ४ लाख रुपये मदत देण्यात येणार आहे. तर 40 ते 60 टक्के अपंगत्व आलेल्या व्यक्तींना 74000/- मदत देण्यात येणार आहे.
60 टक्के पेक्षा जास्त अपंगत्व आलेल्या व्यक्तींना 2 लक्ष 50 हजार मदत देण्यात येणार आहे. एक आठवड्यापेक्षा जास्त रुग्णालयात असल्यास 16000/- मदत देय आहे. एक आठवड्यापेक्षा कमी रुग्णालयात असल्यास 5400/- मदत देय आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.