अक्षय गवळी, अकोला
अकोल्यात गुन्हेगारीत सातत्यानं वाढ होत आहे. आता सुरक्षेसाठी अकोला पोलिसांचा प्रतिबंधक कारवाईवर चांगलाचं जोर वाढला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता अकोला पोलिसांनी थेट सराईत गुन्हेगारांना एक वर्षासाठी तुरुंगाचा मार्ग दाखवणार आहे. अकोला पोलिसांनी एका महिन्यात जिल्ह्यातील 3 सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. (Latest Marathi News)
अकोल्यात पोलिसांकडून गुन्हेगारांना वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येत आहे. अकोला पोलिसांकडून प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर अशी कारवाई झाली आहे. आज 7 फ्रेब्रुवारी रोजी देखील पोलीसांनी एका सराईत गुन्हेगाराला एका वर्षासाठी स्थानबद्ध केलं आहे. विनायक महेंद्र येन्नेवार (वय 24 वर्ष) असं या आरोपीचं नाव आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
विनायक याच्यावर यापुर्वी जबरी चोरी करताना इच्छापुर्वक दुखापत करणे, जबरी चोरी करण्याचे उद्देशाने अपहरण, जिवे मारण्याची धमकी, दुखापत करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, घरात घुसून खंडणी मागुन नुकसान करणे, सार्वजनिक ठिकाणी आपसात झोंबाझोंबी करणे, दरोडयाचा घालण्याची पुर्वतयारीसह मालमत्तेचे बंद ठिकाण फोडुन चोरी करणे, असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. अनेक कारवाई करून सुद्ध 'तो' कुठल्याही कारवाईस जुमानत नसल्याने त्याच्याविरुद्ध ही गंभीर दखल घेण्यात आली आहे.
अकोला जिल्हादंडाधिकारी अजित कुंभार यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून अकोला जिल्हा कारागृहात कुख्यात गुंडाविरूध्द एमपीडीए कायदया अंर्तगत स्थानबद्ध आदेश पारीत केले. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेतील कार्यरत पीएसआय आशिष शिंदे यांनी केली आहे.
सराईत गुन्हेगार व गुंडांना या कारवाईचा चांगलाच धसका
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर वचक निर्माण होणे आवश्यक असतेय. त्यामुळ अकोल्यात पोलिस अधिक्षक बच्चन सिंग यांच्या पुढाकारानं प्रतिबंधक कारवाईवर चांगलाच जोर घेण्यात येत आहे. सद्यस्थित जानेवारी पासून जिल्ह्यात एमपीडीए कायद्यांर्तगत 3 जणांवर कारवाई झाली आहे. राहुल मोहन रंधवे, मोहम्मद उमर मोहम्मद रियाज आणि विनायक येन्नेवार असे या तिघांची नावे आहे.
समाजात दादागिरी करून अवैध धंदे करणारे गुंड आणि त्यांच्या टोळ्यांविरुद्ध पोलीस प्रतिबंधक कायद्यांतर्गत अर्थात 'एमपीडीए'नुसार कारवाई करण्यात येत असून यापुढेही अशा कारवाया सुरूच राहतील, असे पोलीस अधिक्षक बच्चन सिंग यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.