Akola  saam tv
महाराष्ट्र

Akola News : ...अवैध शस्त्र विक्रीस येतात कोठून ? अकाेला पोलिसांपुढे माेठे आव्हान

अकाेला पोलिसांच्या कारवाईचे शहरात काैतुक हाेत असले तरी गुन्हेगारांची पाळमुळं उखडून टाका अशी शहरवासियांत चर्चा सुरु आहे.

Siddharth Latkar

- हर्षदा सोनोने 

Akola Crime News : अकोला शहरातील खोलेश्वर परिसरात एका घरातून बेकायदेशीररीत्या शस्त्रांची खरेदी-विक्री होत असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने (akola local crime branch) छापा टाकला. या छाप्यात संमू राजपूत या युवकाकडून एलसीबीेने एक पिस्तूल, एक रिव्हॉल्व्हर, सात राऊंड तसेच दोन धारदार तलवारी असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आला आहे. या टोळीतील तिघांना एलसीबीने अटक केली आहे. (Maharashtra News)

पाेलिसांनी संमू राजपूत याला ताब्यात घेतल्यानंतर अधिक चाैकशीत ताे बेकायदेशीररित्या शस्त्र विक्री करीत असल्याची माहिती समाेर आली. त्याने एक पिस्टल व एक रिव्हाल्वर व दोन लोखंडी धारदार तलवार गौरक्षण रस्त्यावर राहणाऱ्या हरी झाडे व उमरी परिसरातील आकाश आसोलकर याला विकल्याचे एलसीबीला सांगितलं.

एलसीबीने (lcb) त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल, एक गावठी बनावटीचे रिव्हाल्वर, सात काडतूस, दोन लोखंडी तलवार असा शस्त्रसाठा जप्त केला. पाेलिसांनी संभू राजपूत, हरी झाडे व आकाश आसोलकर या तिघांना अटक केली.

ही कारवाई पोलिस (Police) अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष दुधगावकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गोपाल जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक दशरथ बोरकर, राजपाल ठाकूर, गणेश पांडे, फिरोज खान, गोकुळ चव्हाण, भास्कर धोत्रे, खुशाल नेमाडे, आकाश मानकर, अभिषेक पाठक, धीरज वानखेडे, मो. आमीर, लिलाधर खंडारे, अन्सार शेख, स्वप्नील खेडकर यांनी केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : दिवसभरात कमीत कमी रिस्क घ्या; ५ राशींच्या नेत्यांनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत, अन्यथा...

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Ayushman Bharat: ५ लाख नाही तर १० लाखांपर्यंत मोफत उपचार; कोणत्या कुटुंबांना होणार फायदा? वाचा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT