Deputy CM Devendra Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis On Akola Accident: मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाखांची मदत, घटनेची चौकशी होणार; फडणवीसांनी दिले महत्वाचे आदेश

Akola Paras Temple Accident : या घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Akola News: अकोल्यामधील (Akola) पारसगावातील मंदिराच्या शेडवर झाड कोसळून सात भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेमध्ये 37 जण जखमी झाले आहेत. या घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या दुर्घटनेची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.

पारस दुर्घटनेप्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'पारसची घटना अतिशय दुर्दैवी आणि गंभीर आहे. त्या ठिकाणी शेडवर झाड कोसळले आणि ते शेड कोसळून सात भाविकांचा मृत्यू झाला. यामध्ये 37 जण जखमी झाले आहेत. मी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो आणि जखमींना चांगल्या रुग्णालयात उपचार मिळावे अशा सूचना दिल्या आहेत.'

'या दुर्घटनेत जखमी झालेल्या सर्वांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकारच्या वतीने केला जाईल. तर मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्यात येईल. या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि आमच्या सर्व संवेदना या परिवाराच्या सोबत आहे.' असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

तसंच, 'राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाबाबत फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'अवकाळी पावासाच्या संदर्भातील पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याठिकाणी प्राथमिक अंदाज आमच्याकडे आले आहेत. पण अंतिम अंदाज आल्यानंतर त्याबद्दल सांगू.', असे त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, अकोलातल्या बाळापुर तालुक्यातील पारस येथील बाबूजी महाराज मंदिरात आरती सुरू असतानाच टिनशेडवर अचानक कडूलिंबाचं झाड कोसळले. 100 वर्षे जुनं झाड शेड कोसळल्यामुळे शेडखाली 40 ते 50 गावकरी दबले. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केला आणि जखमींना बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. तर 37 जखमींवर अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामधील पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Suraj Chavan: 'मला वेड लावलयं...'म्हणतं रितेश भाऊंच्या गाण्यावर गुलीगत सूरजनं धरला ठेका, Video पाहा

Candidate List Party wise : निवडणूकीच्या रिंगणात किती पक्षांचे उमेदवार, शिवसेना-ठाकरे कोणत्या क्रमांकावर? अशी आहे संपूर्ण यादी

TMKOC Fame Jheel Mehta: कोण आहे भिडेंचा जावई? 'तारक मेहता' फेम सोनू लवकरच अडकणार लग्नबंधनात; तारीखही ठरली

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; प्रॅक्टिसदरम्यान 'या' फलंदाजाच्या हाताला दुखापत

SCROLL FOR NEXT