महाराष्ट्र

सर्पमित्राच्या परिवाराला वाचवण्यासाठी गावकरी फिरतायेत रस्त्यावर

सर्पमित्राच्या परिवाराला वाचवण्यासाठी गावकरी फिरतायेत रस्त्यावर

जयेश गावंडे

अकोला : अकोल्यातील मूर्तिजापूर येथील प्रतिकनगर येथील रहिवाशी सर्पमित्र संजय दौड यांचा अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना १५ सप्टेंबरला घडली. परंतु, पत्‍नी व मुलाच्‍या उपचारासाठी पैसे नसल्‍याने या परिवारासाठी नागरीक रस्‍त्‍यावर फिरून निधी संकलीत करत आहेत. (akola-news-Villagers-walk-the-streets-to-save-Sarpamitra's-family)

परिवारासह सासरवाडीहून दुचाकीने मूर्तिजापूर येत असताना अपघात झाला होता. या अपघातात सर्पमित्र संजय दौड याचा मृत्‍यू झाला. तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली असून मुलगा अत्यवस्थ होता. घरची परिस्थिती हलाखीची घरातील कर्ता व्यक्ती अपघातात मृत झाला. आता परिवारातील एकुलता एक मुलगा तोही अपघातात गंभीर जखमी झाला. त्याच्यावर अकोल्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रस्‍त्‍यावर फिरून निधी संकलन

उपचारासाठी पैसे कुठून आणि कुणी आणायचे असा प्रश्न पडला. मात्र म्हणतात या जगात अजूनही माणुसकी जिवंत आहे. याची प्रचिती मूर्तिजापूर वासीयांनी आणून दिली. मुर्तिजापूर वासीयांनी पार्थ आणि त्याच्या आईला वाचवण्यासाठी मूर्तिजापूर येथील रस्त्यावर फिरून निधी गोळा करीत आहेत.

मदतीसाठी धावून जायचा

35 वर्षीय संजय दौड अत्यंत गरीब परिस्थिती हे कोणाचाही मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता होता, त्याने आतापर्यंत अनेक सापांना जीवदान दिले आहे. तर उपजीवकेसाठी पान सेंटरचा व्यवसाय सुरु केला होता. त्यातून आपल्या परिवाराचा उदर निर्वाह करायचा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

SCROLL FOR NEXT