Chinese Manja Saam tv
महाराष्ट्र

Chinese Manja : अकोल्यात चायना मांज्याने दोन जण जखमी; गळा कापला गेल्याने पडले सहा टाके

Akola News : अनेक ठिकाणी पोलिसांनी चायना मांज्यावर रेड टाकून चायना मांज्या जप्त केला आहे. तरी पण चायना मांज्या दिसून येत आहे

Rajesh Sonwane

हर्षदा सोनोने 

अकोला : राज्यात बंदी असताना चायना मांजा पतंग उडविण्यासाठी वापरला जात आहे. या मांजामुळे अनेक (Chinese Manja) दुर्घटना घडत असून देखील यावर पूर्णतः बंदी आलेली नाही. अशीच घटना अकोल्यात (Akola) घडली असून या चायना मांजामुळे दोन जण जखमी झाल्याची घटना आज घडली आहे. (Live Marathi News)

अकोला शहरामध्ये मोठ्या प्रमाणात चायना मांज्याची अजूनही विक्री होत. अनेक ठिकाणी पोलिसांनी चायना मांज्यावर रेड टाकून चायना मांज्या जप्त केला आहे. तरी पण चायना मांज्या दिसून येत आहे. या चायना मांज्याने जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. अशीच घटना आज सकाळी घडली आहे. शहरातल्या खदान येथून अकोट फाईल येथे कुटार आणण्यासाठी गेलेल्या दोन जण परत येतांना उडान पुलावर चढत असताना गळ्याला चायना मांजा अडकल्याने दोघेजण जखमी झाले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गळ्याला पडले सहा टाके 

अकोला शहरातील खदान येथील रहिवासी मोहम्मद आसिफ यांचा गळा कापला गेल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या गळ्याला सहा टाके पडले आहेत. याच घटनेत मोहम्मद आसिफ यांच्या आजीचा देखील हात कापला गेल्याने हे दोघंही जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pravin Tarde: बॉलिवूडवाले अंत्यविधीला न आल्याने नाना पाटेकरांचं मोठेपण कमी होत नाही...; प्रवीण तरडे स्पष्टच बोलले

इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान ठाकरे गटाला मोठा धक्का; पक्ष प्रवक्त्याचा तडकाफडकी राजीनामा

Bedroom Decoration Ideas For Couple : रोमॅन्टिक कपलसाठी बेडरूम डेकोरशनच्या 5 भन्नाट आयडिया, आनंददायी वाटेल

Navratri 2026 : नवरात्रीत देवीसमोर 'या' दिशेला लावा अखंड दिवा; घरात येईल पैसाच पैसा

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीचा थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

SCROLL FOR NEXT