अक्षय गवळी, साम टीव्ही अकोला
अकोल्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. बाळापूरचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी (MLA Nitin Deshmukh) बाळापूरचे तहसीलदार आणि तालूका कृषी अधिकाऱ्यांना नगरपालिका कार्यालयात कोंडलं. व्हिडिओमध्ये दिसतंय की, आमदार नितीन देशमुख यांनी कार्यालयाचा अगोदर कडी लावली मग् टाळा लावत अधिकाऱ्यांना कार्यालयामध्येच बंद केलंय.
नेमकं प्रकरण काय?
बाळापूरचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना नागरिकांकडून विमा कंपन्यांसंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी विमा कंपन्यांच्या तक्रारीविरोधात नगरपालिकेत आमदार देशमुखांनी सर्व अधिकारी आणि विमा कंपन्यांची बैठक बोलावली होती. परंतु बेठकीला विमा कंपन्यांचे आणि कृषी विभागाचे अधिकारी गैरहजर होते. त्यामुळे आमदार नितीन देशमुख यांना संताप अनावर झाला (Shiv Sena Thackeray Group) होता. संतापाच्या भरात आमदार देशमुखांनी तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना कार्यालयामध्ये कोंडलं. अनुपस्थित अधिकारी आल्याशिवाय कुणालाच आतून सोडणार नाही, असा इशारा आमदार नितीन देशमुख यांनी दिलाय.
नेमकं काय घडलं बाळापुरच्या नगरपालिकेत?
शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी देशमुख यांच्याकडे गेल्या होत्या. परंतु बैठकीला अधिकारी अनुपस्थित असल्यामुळे आता नितीन देशमुख यांनी आक्रमक झाल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे सर्व विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना बैठकीसाठी आपण सुचना दिल्या होत्या. मात्र कंपनीतील कर्मचारी बैठकीला हजर झाले नाही, असेही बाळापुरचे तहसीलदार वैभव फरताडे यांनी म्हटलं (Akola News) आहे.
मागील आठवड्यात आमदार नितीन देशमुख यांनी विमा कंपनीच्या प्रतिनिधींना धमकी दिली होती. शेतकऱ्यांवर अन्याय केला, तर अकोल्यात विमा कंपनीचा एकही प्रतिनिधी दिसू देणार नाही, अशी नितीन देशमुखांची विमा कंपनी प्रतिनिधीला धमकी (Insurance Company Issue) होती. फोनवरील धमकीचा एक व्हिडीओ देखील 'साम'च्या हाती लागला होता. अकोला जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून अत्यल्प परतावा मिळला आहे. आपण धमकी आणि शिवीगाळ केल्याचं नितीन देशमुखांनी समर्थन केलं होतं. विमा कंपन्यांची मस्ती उतरवण्यासाठी याच भाषेत बोलणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.