Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Heavy Rain : अकोला जिल्ह्याला पावसाने झोडपले; गावांमध्ये शिरले पाणी, वाडेगाव ते बाळापुर वाहतूक बंद

Akola News : पुरामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली.. अर्थातच अनेक शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झाले. यामध्ये सोयाबीन, कापूस, मूग, उडीद उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : अकोला जिल्ह्यातील पातुर व मूर्तिजापूर तालुक्याला ढगफुटी सदृश्य पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे. यामुळे नदी-नाल्यांना पूर स्थिती निर्माण झाली आहे. पातूर तालुक्यातल्या निर्गुणा नदीला देखील पूर आला असून निर्गुणा नदीच्या पुलावरून चार ते पाच फूट पाणी वाहत आहे. तर आलेगाव इथल्या पुलावरून जवळपास ४ ते ५ फूट पुराचे पाणी वाहत असल्याने २० ते २५ गावांचा संपर्क तुटला आहे. 

राज्यात सर्वत्र पाऊस सक्रिय झाला आहे. दोन- तीन दिवसांपासून मुसळधार पावसाचा तडाखा अनेक भागांत बसत आहे. अशात अकोला जिल्ह्यात देखील जोरदार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. यात जिल्ह्यातील पातुर आणि मुर्तीजापुर तालुक्याला ढगफुटी सदृश्य पावसाने चांगलाच तडाखा दिला. पावसामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

अनेक भागात घरात घुसले पाणी 

पातुर- वाडेगाव मार्गावरील मोर्णा नदीला पूर आलेला असल्याने वाडेगाव ते बाळापुर वाहतूक बंद झाली आहे. तर तालुक्यातील आस्टुल, पास्टूल, कोठारी, मळसूर, विवरा, आलेगाव चान्नी या परिसरात शेती आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर तालुक्यातील अंधार सांगवी पांढूर्णा, मोर्णा, मन नदीला पूर आल्यामुळे अनेक गावांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. पावसामुळे चोंडी, अंधार सांगवी या गावांचा संपर्क तुटला आहे. तर आले गावात नदीच्या पुराचे पाणी गावातील घरांमध्ये घुसले आहे. 

पिकांचे नुकसान 

दुसरीकडे बल्हाळी गावात मन नदीला पूर आल्यामुळे परिसरातील शेती आणि लिंबू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तर मुर्तीजापुर तालुक्यातील राज्य महामार्गावरच्या चिखली येथील नाल्याला पूर आल्यामुळे तेथील वाहतूक दुपारी बंद झाली असून जिल्हा प्रशासनाने पुढच्या २४ तासांत जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता असल्याने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

Sleeping : रात्रभर पंखा चालू ठेवून झोपताय? आजच बदला 'ही' सवय, शरीराचे होतेय गंभीर नुकसान

Maharashtra News Live Update: दुष्काळ निवारणासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांतून निधी उभारण्याचे मंत्री उदय सामंत यांचे आवाहन

CJI Surya Kant : सरन्यायाधीश सूर्य कांत यांचा इंडिया आघाडीला भेटीस नकार, पाहा काय दिलं कारण

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'मध्ये दुसरी वाइल्ड कार्ड एन्ट्री! सलमान खाननं वीकेंड का वारमध्ये दिलं सरप्राइज, सोशल मीडिया स्टार आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT