Orange Alert Saam tv
महाराष्ट्र

Orange Alert : चंद्रपूर, वाशीम, यवतमाळ जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट; अकोल्यासह चार जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस 

Akola News : राज्यात मागील आठवड्यापासून वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होत आहे. अजून देखील काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : राज्यातील काही जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान आज चंद्रपूर, वाशीम आणि यवतमाळ (Yavatmal) या तिन जिल्ह्यांना ऑरेंज अर्लट देण्यात आला आहे. गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्‌याचा वारा राहणार; असा इशारा देण्यात आला आहे. तर अकोल्यासह (Akola) चार जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra News)

राज्यात मागील आठवड्यापासून वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होत आहे. अजून देखील काही भागात पावसाची (Rain) शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार चंद्रपूर, वाशीम व यवतमाळ जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. तर अमरावती आणि भंडारा (Bhandara) जिल्ह्याला विजांच्या कडकडाटासह बादळ आणि सोसाट्‌याचा वारा त्याचा वेग ४०-५० किमी प्रति तासापर्यंत असण्याची शक्यता आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उद्या वादळी वाऱ्याची शक्यता 
दरम्यान अकोला, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपुर: आणि वर्धा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह बादळ आणि सोसाट्‌याचा वारा (वेग ३०-४० किमी प्रति तासापर्यंत) वेगळ्या ठिकाणी राहणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तविली आहे. तर २५ एप्रिलला चंद्रपुर, गडचिरोली, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि सोसाट्‌याचा वारा वेगळ्या ठिकाणी राहणार आहे, असा अंदाज हवामान विभागात दिलाय.

काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचं आवाहन-
दोन दिवस वादळी वर व पावसाची शक्यता असल्याने संरक्षणात्मक कपडे घाला आणि घरातील आश्रय घ्या. पॉवर लाईन्स किंवा विजेच्या तारा पासून दूर राहा. उपकरणांचे संरक्षण करण्यासाठी घराला संपूर्ण- हाउस सर्ज प्रोटेक्टरसह सुसज्ज करा. झाडांखाली आश्रय घेऊ नका आणि विशेषतः वेगळ्या झाडाखाली, जसे की वीज चालवणे. गडगडाटी वादळादरम्यान तुम्ही गटात असाल तर एकमेकांपासून वेगळे व्हा; असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT