Akola News Saam tv
महाराष्ट्र

Akola News : कुटुंब जेवत असताना तब्बल ३५ रानडुक्कर घरात घुसले, शेतकऱ्याने शक्कल लढवली; अन्...

Akola Partur News : अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या पिंपळखुटा या गावात हि घटना समोर आली आहे. गावातील मेहमूद शहा यांच्या घरात आज दुपारच्या सुमारास ३५ रानडुकरांचा कळप शिरल्याने मोठा गोंधळ उडाला

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 
अकोला
: गावात वन्य प्राण्यांचा वावर मागील काही दिवसांपासून वाढला आहे. यात हल्ले होण्याच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. दरम्यान अकोला जिल्ह्यात रानडुकरांनी हैदोस घडल्याचे समोर आले आहे. यातच ३५ रानडुकरांच्या कळपाने एका घरात प्रवेश केला. अचानक डुकरांचा कळप आल्याने परिवार भयभीत होऊन घराच्या बाहेर पडला होता. मात्र यात एका मुलगा जखमी झाला आहे.   

अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या पिंपळखुटा या गावात हि घटना समोर आली आहे. गावातील मेहमूद शहा यांच्या घरात आज दुपारच्या सुमारास ३५ रानडुकरांचा कळप शिरल्याने मोठा गोंधळ उडाला होता. यावेळी मेहमूद शहा या शेतकऱ्याने परिवारातील सदस्यांना बाहेर काढत ३५ रानटी डूकारांना घरात कोंडून ठेवलं होत. तसेच या संपूर्ण प्रकरणाची माहिती वन विभागाला देण्यात आली होती. 

वन विभागाच्या पथकाकडून रेस्क्यू 

तब्बल दोन तास घर बंद करून रानडुकरांना घरात कोंडण्यात आले होते. वन विभाग पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर घरात शिरलेल्या सर्व रानडुकरांना रेस्क्यू करून पकडण्यात आले. यानंतर त्यांना जंगलात सोडून देण्यात आले. मात्र एक नव्हे तर तब्बल ३५ रानडुक्करांचा कळप मेहमूद शहा यांच्या घरात शिरल्याने या रानडुकरांनी घरातील संपूर्ण सामानाच मोठे नुकसान केले. 

हल्ल्यात मुलगा जखमी 

घरातील वस्तूंसह शेतकऱ्याने घरात ठेवलेल्या शेतमालाचे मोठ नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे रानडुकराच्या हल्ल्यात शाह यांच्या परिवारातील एक मुलगा जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घरात रानडुकर शिरल्याने गावात मोठा गोंधळ उडाला होता. गावकर्यांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT