Akola News
Akola News Saam tv
महाराष्ट्र

अचानक रेल्‍वे धावू लागली..पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे मुलाचा जीव वाचला; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

जयेश गावंडे

अकोला : आई– वडील रेल्‍वे ट्रॅकवर उतरले अन्‌ अचानक ट्रेन धावू लागली. रेल्‍वेत राहिलेला चार वर्षीय मुलगा प्‍लॅटफॅार्मवर उतरण्याचा प्रयत्‍न करू लागला. याचवेळी (Railway) रेल्वे स्थानकावर असलेल्‍या लोहमार्ग पोलिसाच्या (Railway Police) प्रसंगावधानामुळे त्‍या लहान मुलाचा जीव वाचल्याची घटना अकोला येथे घडली आहे. (Breaking Marathi News)

शालीमार एक्सप्रेस (Akola) अकोला रेल्वे स्टेशनवरील फ्लॅट क्रमांक १ वर येवून थांबली होती. या ट्रेनमधून प्रवास करणारा एक अपंग व्यक्ती गर्दी असल्याने आपली पत्नी व 4 वर्षाच्या लहान मुलासह प्लॅटफॉर्मवर न उतरता विरूध्द बाजूने खाली रेल्वे ट्रॅकवर उतरला होता. दरम्यान रेल्वेगाडी पुढील स्थानकाकडे निघण्यासाठी तयार असताना त्यांचा लहान ४ वर्षांचा मुलगा अचानक ट्रेनच्या खालून प्लॅटफॉर्म बाजूकडे येवू लागला.

मुलाला ओढल्‍याचा प्रसंग सीसीटीव्‍हीमध्‍ये कैद

प्लॅटफॉर्मवर बंदोबस्ताकरीता हजर असलेले पोलीस उपनिरीक्षक दिलीप जाधव व पोलीस शिपाई गोपाळ सोळंगने यांनी प्रसंगावधान दाखवून सदर लहान मुलाला प्लॅटफॉर्मवर ओढून घेवून त्याचा जिव वाचवला. त्यानंतर अवघ्या १० सेकंदात ट्रेन पुढील स्थानकासाठी रवाना झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar Water Crisis : हर्सूल तलावाने गाठला तळ; केवळ अडीच टक्के साठा शिल्लक

Health Tips : तळलेलं तेल पुन्हा जेवणात वापरताय? तुम्हालाही होऊ शकतो कॅन्सर, ICMR च्या अभ्यासातून नवीन माहिती उघड

Sangli News: पाय घसरला, अनर्थ घडला, शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू; गावावर शोककळा

Jalgaon Gold-Silver Rate News : सोने-चांदीने पुन्हा उच्चांक गाठला!

Liver Health: दररोज करा हे 2 योगासन, यकृत राहील निरोगी

SCROLL FOR NEXT