अकोला जिल्ह्यातील कुरणखेड येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस उपनिरिक्षकाला (PSI) कारने उडवलं. यात बोरगावमंजू पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मोरे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. उपनिरीक्षक मोरे हे बोरगाववरून मूर्तिजापूरच्या दिशेने जात असतांना हा अपघात झाला आहे.
अपघात झालेली चारचाकी गाडी पोलिसांच्या ताब्यात. दुचाकीवरून जात असताना मोरे यांच्या दुचाकीला कारनं उड़वल्यानं ही दुःखद घटना घडली आहे. मोरे हे अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पीएसआय राजेंद्र मोरे बोरगाववरून मूर्तिजापूरच्या दिशेने जात होते. दरम्यान कुरणखेड येथे असताना आलेल्या भरधाव कारने त्यांना जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की ते रस्त्यावर जोरात आपटले. यात त्यांच्या डोक्याला जबर बार लागल्यांने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कार अकोल्यातीलच असून नागपूरवरून अकोल्याकडे येत होती.
पीएसआय राजेंद्र मोरे अकोला येथे कुटुंबासह रहात होते. आपल्या दुचाकीने दररोज अकोल्यातून बोरगावमंजू पोलीस ठाण्यात येत होते. त्यांना दोन लहान मुले असून त्यांच्या आकस्मिक मृत्यूने ती मुले पोरकी झाली आहेत. अचानक घडलेल्या या घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.