Food poisoning
Food poisoning Saam tv
महाराष्ट्र

वाढदिवसाचे जेवण पडले महागात; अडीचशे जणांना विषबाधा, तिघे गंभीर

जयेश गावंडे

अकोला : वाढदिवसाचा कार्यक्रम पाहुण्यांना चांगलाच भोवला. वाढदिवसाचा कार्यक्रमात आलेल्‍यांना जेवणाचे निमंत्रण होते. कार्यक्रम आटोपल्‍यानंतर जेवण केले. परंतु, जेवण सर्वांना चांगलेच महागात पडले असून, जेवणातून विषबाधा (Food Poisoning) झाल्‍याचा प्रकार घडला. (akola news Birthday meals Two hundred and fifty people poisoned three seriously)

अकोल्यातील (Akola) मूर्तिजापूर तालुक्यातल्या घुंगशी येथील एका वाढदिवसाच्या कार्यक्रमातील जेवणातून तब्बल 200 ते 250 जणांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. घुंगशी गावातील गोपाल सौंदळे या व्यक्तीच्या लहान मुलाच्या वाढदिवसाचा (Birthday) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जवळपास 300 जणांना या वाढदिवसासाठी बोलावण्यात आले होते. सर्वांसाठी जेवणाचे आयोजन ही करण्यात आले होते.

तिघे गंभीर

मात्र जेवणानंतर अनेकांना उलट्या व जुलाब सुरू झाल्या. दरम्यान विषबाधा झाल्याचे लक्षात येताच पारद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (Hospital) उपचार करण्यात आले. तर काही जणांना शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. दरम्यान यापैकी तिघे गंभीर असल्याची माहिती आहे. या तिघांवर उपचार सुरू आहेत. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र वाढदिवसाचा कार्यक्रम अनेकांना भोवलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: घरात मनी प्लांट लावताना या चुका टाळा; अन्यथा प्रगती थांबेल

Today's Marathi News Live: ४ जूननंतर अच्छे दिनाची सुरुवात होईल - उद्धव ठाकरे

Khadakwasla Dam Water Level: पुणेकरांना दिलासा, पाणीकपातीचे संकट टळलं; जाणून घ्या खडकवासला धरण साखळी पाणीसाठ्याची स्थिती

Chardham Yatra Bus Accident | बुलढाण्यातून चारधाम यात्रेसाठी गेलेल्या भाविकांच्या बसला भीषण आग

Soami Bagh Mausoleum : सेम टू सेम ताजमहालच! बांधकामाला १०० हून अधिक वर्षांचा काळ; पर्यटकांचं ठरतंय आकर्षण

SCROLL FOR NEXT