Akola Accident Saam TV
महाराष्ट्र

Akola Accident: क्षणात होत्याचं नव्हतं झालं! कार आणि बाईकची जोरदार धडक; भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Accident News: या अपघातात जिल्ह्यातल्या अहमदपूर येथील 35 वर्षीय दीपक पळसपगार यांचा जागीत मृत्यू झाला. अपघात इतका भयंकर होता की यात बाईकसह कारचा चक्काचूर झाला आहे.

Ruchika Jadhav

Akola Bike Accident:

राज्यातील रस्ते अपघाताच्या घटना थांबता थांबत नाहीयेत. वेग मर्यादेचे उल्लंघन, रस्त्यांवरील खड्डे अशा विविध कारणांमुळे अपघाताच्या घटना वाढत चालल्या आहेत. अशात अकोल्यातून अपघाताची एक मोठी घटना समोर आलीये. दुचाकीचा अपघात झाल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पातूरपासून अकोल्याकडे येतांना सुमारे 5 किलोमीटर अंतरावर शिर्ला फाट्यानजीक असलेल्या बुद्धभूमी समोर रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन हा अपघात (Accident) झाला. या अपघातात जिल्ह्यातल्या अहमदपूर येथील 35 वर्षीय दीपक पळसपगार यांचा जागीत मृत्यू झाला. अपघात इतका भयंकर होता की यात बाईकसह कारचा चक्काचूर झाला आहे.

सुखी संसार सुरू होण्याआधीच सर्व संपलं!

छत्तीसगडमध्येही काल अपघाताची एक मोठी घटना घडली. छत्तीसगडच्या जांजगीर चंपा जिल्ह्यात लग्नाहून परतताना कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात नवविवाहित दांपत्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

छत्तीसगडमधील (Chhattisgarh) जांजगीर-चंपा जिल्ह्यात ही दुर्दैवी घटना घडली.शुभम सोनी आणि शिवरीनारायण येथील नेहा यांचा शनिवारी रात्री विवाह सोहळा झाला. वाजत गाजत वरात निघाली. रविवारी सकाळी नवरा नवरी कारमधू घरी परतत होते त्यावेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला. कारमध्ये नवरा-नवरीसोबतच कुटुंबातील अन्य तीन व्यक्तींचाही मृत्यू झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जत तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची सरकारला सुबुद्धी दे, गणरायाला दुष्काळग्रस्तांचे आरती करून साकडे

Rain Alert: शेतकऱ्यांना दिलासा! राज्यभर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज, २३ जिल्ह्यांना इशारा

Matcha Tea : सकाळी की संध्याकाळी? माचा चहा पिण्याची योग्य वेळ कोणती?

Monday Horoscope : चांदीच चांदी होणार! या 5 राशींना मिळणार नशिबाची साथ, पैशांचा मार्ग होणार मोकळा; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Kalyan Crime: माझ्या एरियात धंदा करायचा असेल तर...; कल्याणमध्ये 'मज्जू' भाईची दहशत, व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवला अन्...

SCROLL FOR NEXT