Akola News Saam tv
महाराष्ट्र

Akola : गोमांस विक्रीच्या दुकानावर धाड; दोन गट आमने- सामने, अकोल्यात तणावाचे वातावरण

Akola News : दोन्ही गट आमने- सामने आले असून दोन्ही गटांची एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकारानंतर सिटी कोतवाली पोलीस स्टेशनसमोर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : अकोल्यातील बैदपुरा भागात गोमांस विक्री करणाऱ्या दुकानावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने धाड टाकण्यात आली होती. मात्र या धाडीवरून दोन गट आमने- सामने आले आहेत. दोन्ही गटातील नागरिकांमध्ये जोरदार वाद होऊन दगडफेक व मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून याठिकाणी पोलीस देखील उपस्थित आहेत. 

अकोला शहरातील बैदपुरा भागात हा प्रकार आज दुपारच्या सुमारास घडला आहे. बैदपुरा भागात एका दुकानातून गोमास विक्री सुरू असल्याची माहिती बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलीस व बजरंग दलाचे कार्यकर्ते यांनी मिळून सदरच्या दुकानावर कारवाई करण्यासाठी धाड टाकली. मात्र या धाड सत्रानंतर दोन्ही गट आमने- सामने आले असून जोरदार राडा झाल्याचे पाहण्यास मिळाले.  

मोठा पोलीस बंदोबस्त 

अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनसमोर दोन्ही गट आमने- सामने आले असून दोन्ही गटांची एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकारानंतर सिटी कोतवाली पोलीस स्टेशनसमोर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. दरम्यान या राड्यात पोलिसांवर दगडफेक आणि मारहाण झाल्याची प्राथमिक सूत्रांची माहिती आहे. मात्र मारहाण झाल्याचा दावा पोलिसांनी नाकारला आहे. 

मोठ्या प्रमाणात गर्दी 

गोमांस विक्री होत असल्याच्या माहितीवरून टाकण्यात आलेल्या धाडीनंतर राडा झाला. याची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलीस स्टेशनसमोर भाजप, विश्व हिंदू परिषद कार्यकर्त्याची मोठी गर्दी केली. तसेच पोलीस स्टेशनमध्ये काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण हे देखील दाखल झाले असून थोड्याच वेळात भाजप आमदार रणधीर सावरकर पोलीस स्टेशनमध्ये पोहचणार असल्याची माहिती मिळत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये खाजगी बस आणि एसटी बसचा अपघात

येमेनजवळील समुद्रात मोठी दुर्घटना; जहाजावरील LPG टँकरला भीषण आग, जहाजावर होते २३ भारतीय खलाशी

Eyebrow Care: आयब्रो डार्क दिसत नाहीत? मग नॅचरल टिप्स फॉलो करा काहीच दिवसात जाणवेल फरक

Moisturizer: जास्त मॉइश्चरायझर लावल्याने त्वचेवर काय परिणाम होतो?

Bihar : बिहारच्या राजकारणाला धक्कादायक वळण; स्वबळावर लढण्याची घोषणा करणाऱ्या JMM ची निवडणुकीतूनच माघार

SCROLL FOR NEXT