Akola News Saam tv
महाराष्ट्र

Akola News: पिवळ्या दिव्‍याची गाडी फिरवत पान टपऱ्यांवर कारवाई; तोतया अधिकाऱ्याला अटक

पिवळ्या दिव्‍याची गाडी फिरवत पान टपऱ्यांवर कारवाई; तोतया अधिकाऱ्याला अटक

जयेश गावंडे

अकोला : 'एनसीबी'च्या तोतया अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील दहिहांडा पोलिसांनी (Police) ही कारवाई केली आहे. नदीम शाह दिवाण असं या भामट्याचे नाव असून तो अकोला (Akola) जिल्ह्यातील चोहोट्टाबाजारचा मूळ रहिवासी आहे. नदीमसोबत त्याच्या तीन साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (Live Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार नागपूर शाखा एनसीबीचा अधिकारी असल्याचे सांगत नदीम शाह दिवाण याने अकोला जिल्ह्यातील चौहट्टा बाजार परिसरात पान टपऱ्यांवर कारवाई केली. दरम्यान मागील एक महिन्यापासून दहीहंडा पोलीस स्टेशन हद्दीत हे एनसीबीचे तोतया अधिकारी फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्‍यानुसार शोध सुरू केला होता.

वाहनावर भारत सरकारचे स्‍टीकर

माहितीच्या आधारे पोलिसांनी चोहट्टा बाजार परिसरात तोतया अधिकारी असलेल्‍या इसमांचा शोध घेतला. तेव्हा हे चारही तोतया अधिकारी आढळून आले असून त्यांच्याकडे एक चारचाकी वाहन, त्यावर पिवळ्या कलरचा दिवा लावलेला होता. तसेच या वाहनावर भारत सरकार असल्याचे स्टिकर होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special 26 च्या धर्तीवर बनावट आयकर छापा; 1 कोटींच्या खंडणी प्रकरणात 10 जणांना अटक

Skincare Tips : चेहरा सतत निस्तेज दिसतोय? स्किन केअर रुटीनमध्ये या सवयींचा समावेश

Maharashtra News Live Update: मराठवाड्याची कुणबी प्रमाणपत्र वाटपात मोठी झेप ! ३ लाख १६ हजारांहून अधिक प्रमाणपत्रे वितरित

Cleaning Tips : ऑफिसच्या किंवा शाळेच्या बॅगमधून कुबट वास येतोय? या सोप्या पद्धतीने करा डिप क्लीन

Horoscope: पुढील ३० दिवस 'या' ८ राशींसाठी ठरणार खास! सूर्य गोचरामुळे पैसा, करिअर आणि यशाचे योग

SCROLL FOR NEXT