Akola Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Akola News: संतापजनक! बदलापूरनंतर अकोल्यात १२ वर्षीय मुलीचा विनयभंग, पोलिसांकडून वृद्ध व्यक्तीला अटक

Akola Crime News : अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यात एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा वृद्ध व्यक्तीने विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

Priya More

अक्षय गवळी, अकोला

बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचारच्या घटनेनंतर राज्यभरात अशा अनेक घटना समोर येत आहेत. अकोल्यामध्ये एका शिक्षकाने सहा अल्पवयीन मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत छेडछाड केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता अकोल्यामध्ये आणखी एक संतापजनक घटना घडली आहे. तेल्हारा तालुक्यात एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा वृद्ध व्यक्तीने विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यातल्या एका गावात राहणारी १२ वर्षांची मुलगी आपल्या लहान बहिणीला शाळेत सोडून घरी परत येत होती. यावेळी सुखदेव जयराम नळकांडे ही व्यक्ती वाईट उद्देशाने तिच्या समोर आले. त्याने तिचा हात पडकडून तिला कवट्यात पकडले. तिच्यासमोर अश्लिल चाळे केले. हा संपूर्ण घडलेले प्रकार मुलीने घरी जाऊन आईला सांगितला. त्यानंतर मुलीच्या आई आणि नातेवाईकांनी तेल्हारा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार केली.

पीडित मुलीच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून तेल्हारा पोलिसांनी सुखदेव नळकांडे या व्यक्तीविरोधात बाल संरक्षण कायदा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य पाहता पोलिसांनी लागलीच या वयोवृद्ध व्यक्तीला अटक केले. न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी अकोला जिल्हा कारागृहात करण्यात आली. याप्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. या घटनेने तेल्हारा तालुक्यात संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहे. दरम्यान हा वृद्ध व्यक्ती सतत महिनाभरापासून पीडित मुलीचा पाठलाग करत होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपुरातील विद्यार्थ्याला अखेर बदलून मिळाले Neet फेरपरीक्षेचे केंद्र

Mouni Roy: मौनी रॉयचा साडीमध्ये ग्लॅमरस अंदाज; कर्व्ही फिगर फ्लाँट करत शेअर केले भन्नाट फोटो

Hardik Pandya : टीम इंडियाला सर्वात मोठा झटका; इंग्लंड वनडे मालिकेतून भरवशाचा खेळाडू बाहेर

LPG बुकिंगनंतरची चिंता संपली! गॅस सिलेंडर कधी येणार? आता मोबाईलवरच पाहा Live Delivery Status

व्यायाम करताना धाडकन जमिनीवर कोसळले; पोलीस कर्मचाऱ्याचा काही क्षणात मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT