फेसबुक युजरने फॉलोवर्स वाढवण्यासाठी 'फॉलो करा आणि इंटरनेट मिळवा' अशी योजना सुरु केलीये
युजर पेज फॉलो करणाऱ्यांना ते 1GB-2GB इंटरनेट रिचार्ज करून देतोय
चार महिन्यातच त्यांच्या फॉलोवर्सची संख्या 15,000 पार गेलीये
ही योजना सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालीये
अक्षय गवळी, साम टीव्ही
आजच्या सोशल मीडियाच्या युगात अनेकांचे लाईक, कमेंट्स आणि फॉलोवर्स वाढवण्यासाठी धडपड पाहायला मिळते. तर काही पठ्ठे आपले फॉलोवर्स वाढवण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरतात. असाच काहीसा प्रकार समोर आलाय. फेसबुकच्या एका युजरने आपले फॉलोवर्स वाढवण्यासाठी एक भन्नाट स्कीम काढली. त्याच्या या स्कीमची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. महाराष्ट्रातील प्रादेशिक वनविभाग क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका वन संरक्षकाची ही गोष्ट आहे.
किरण बाबुराव कांबळे (वय 40) असं वनसंरक्षकाचं नाव असून त्यांनी आपले फेसबुकचे फॉलोवर्स वाढवण्यासाठी एक स्कीम काढली. 'फेसबुक फेज'ला फॉलो करा आणि मिळवा '19 रुपयांपासून अर्थातच 1GB ते 2GB इंटरनेट पॅक', अशी ही स्कीम आहे. ते आपल्या नव्या फॉलोवर्सला वेगवगेळ्या पद्धतीच 'नेट रिचार्ज तसेच रिचार्ज पॅक' मोबाईलवर टाकून देत आहे. विशेष म्हणजे कांबळे यांना या स्कीमचा मोठा फायदा झाला, सविस्तर वाचूयात.
जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पैकी एक म्हणजे 'फेसबुक'. हल्ली आपण प्रत्येक जण फेसबुकचा वापर करतच असतो. फॉलोअर्स वाढत नसतील, तर अनेकांचे नव-नव्या टिप्स घेत प्रयत्न सुरु असतो. जेणेकरून फॉलोवर्स वाढू शकतील. त्याचा काहींना फायदा होतो तर काहींना नुकसान. त्यातही आजकाल लोक चांगल्या दर्जाचे कंटेंट पाहणे पसंत करतायत. त्यामुळे अनेक जण रील आणि पोस्ट बनवताना मोठी काळजी घेतात. तरीही लोकांना कंटेंट आवडत नाहीए. मात्र, फेसबुकच्या एका युजरने अर्थातच वन संरक्षक पदावर कार्यरत असलेले किरण कांबळे यांनी वेगळं करू पाहिलं, आणि ते सक्सेस झालं.
किरण कांबळे हे 2011 मध्ये वर्धा डिव्हिजनमध्ये प्रादेशिक वन विभागात वन संरक्षक या पदावर नोकरीवर लागले. त्यानंतर 2013 पासून त्यांनी फेसबुकवर आपलं पेज बनवलं. त्यामधून वन विभागातील कंटेंट्स, प्राण्यांचे व्हिडिओ आणि केलेली कामगिरी लोकांपर्यंत उपलब्ध करून देऊ लागले. तरीही पाहिजे तसा त्याचा फायदा होत नव्हता. लाईक, कमेंट्स आणि शेअर अजिबात नव्हते. हे सर्व काही 2025 जानेवारीपर्यंत जशाच तसं कायम राहिलं.
जानेवारी सुरुवातीला त्यांनी ही स्कीम काढली. ही स्कीम त्यांनी पेजच्या माध्यमातून लोकांसमोर मांडली. 'फेसबुक पेजला फॉलो करा, अन मिळवा 19 रुपयांचं 1GB ते 2GB इंटरनेट पॅक'. त्यानंतर कांबळेंनी फॉलो केलेल्या लोकांना इंटरनेट रिचार्ज देऊ लागले. रिचार्ज केल्यानंतर त्याचा स्क्रीन शॉट पेजवर अपलोड करत गेले. आता प्रत्येक जण त्यांना फॉलो करतोय, सोबतच मोबाईल नंबर देखील देतो. जेणेकरून ते त्यांच्या मोबाईलवर इंटरनेट असो की गरजूवंत महाविद्यालयीन विद्यार्थी महिन्याभराच रिचार्ज करून देत आहेत.
किरण कांबळे यांचे आज 'Kiran Kamble Vlog' या नावाने फेसबुक पेज असून 15000 हजारांवर फॉलोवर्स झालेत. वन संरक्षक कांबळे मूळ बुलढाणा जिल्ह्यातील चिखली गावचे रहिवासी आहे. त्यांच्या कुटुंबात एक भाऊ पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. सद्यस्थिती ते वर्धा डिव्हिजन मधील प्रादेशिक वन विभागात वर्धा आस्टी येथे कार्यरत आहेत. त्यांचा वृक्ष लागवडीवर मोठा भर असतो, प्रशस्तीपत्र देखील मिळालं. विशेष म्हणजे, चार महिन्यातच त्यांच्या फॉलोवरचा टप्पा 2 हजाराहून 15000 हजार पर्यंत गाठला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.