Akola Crime Saam tv
महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला आजन्म कारावास

गुजरात येथून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अकोला (Akola) सत्र न्यायालयाने विविध कलमांमध्ये आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली

अॅड. जयेश गावंडे

अकोला: अकोल्यातील अकोट फाईल पोलिस (Police) स्टेशनच्या हद्दीतील अल्पवयीन मुलीला गुजरात येथून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अकोला (Akola) सत्र न्यायालयाने विविध कलमांमध्ये आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच ४ लाख १० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. सागर रमेश शंभरकर असे आरोपीचे (Accused) नाव आहे.

हे देखील पाहा-

अकोट फाईल पोलिस (Police स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणारी एक अल्पवयीन मुलगी ही ४ ऑक्टोंबर २०१६ रोजी शाळेत गेली होती. परंतु, ती शाळा सुटल्यानंतरही घरी परत आली नाही. त्यामुळे तिचा शोध सुरू असताना ती मिळून आल्याने यासंदर्भात अकोट फाईल पोलिस (Police) स्टेशन येथे तिच्या आजीने तक्रार दाखल केली होती होती. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करीत त्यानंतर पिडीत अल्पवयीन मुलगी व आरोपी सागर रमेश शंभरकर हा ६ महिन्यांनी घरी परत आले. ते दोघेही गुजरात येथे गेले होते. त्याठिकाणी ते पतीपत्नीसारखे राहत होते, अशी माहिती पिडीतेने पोलिसांना दिली.

पोलिसांनी याप्रकरणी भादवी कलम ३६३, ३७६, ३७६ (२) (एन), पॉक्सो कायदा कलम ३, ४, ५ नुसार गुन्हा दाखल केला आहे आहे. तसेच सागर शंभरकर यास अटक देखील करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास पूर्ण करीत न्यायप्रविष्ठ केले. न्यायालयाने यामध्ये दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकूण न्यायालयाने भा.द.वी. कलम ३६३ मध्ये ७ वर्षे कारावास, १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त शिक्षा, ३७६, ३७६(२)(एन) व पॉक्सो कायदा कलम ३,४, ५ मध्ये दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

विविध कलमामध्ये ४ लाख रुपये दंड व दंड न भरल्यास प्रत्येकी ६ महिन्याची अतिरिक्त शिक्षा सुनावली आहे. सरकारतर्फे एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले होते. पी. एस. आय. छाया वाघ यांनी या प्रकरणाचा तपास केला होता. सरकारतर्फे सहायक सरकारी अभियोक्ता श्रीमती मंगला पांडे व किरण खोत यांनी बाजू मांडली होती.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईच्या कांदिवलीमध्ये घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी

Sunil Gavaskar: ...हे भारतीयांच्या हत्येत योगदान दिल्यासारखंच! सुनील गावस्करांची काव्या मारनवर अप्रत्यक्ष टीका

Shocking: लग्नात रसगुल्ला खाल्ला, पुढच्या काही मिनिटात जीव गेला, नेमकं काय घडलं?

त्र्यंबकेश्वर हादरलं! विद्यार्थी 3 दिवसांपासून बेपत्ता; सगळीकडे शोधाशोध, शाळेच्या मागच्या बाजूस पाहताच... नाशिकमध्ये काय घडलं?

Shocking: पुणे हादरले! कुत्र्यांच्या टोळीचा हल्ला, शरीराचे लचके तोडत जागीच संपवलं; थरकाप उडवणारा VIDEO

SCROLL FOR NEXT