शेअर बाजारात गुंतवणूकदारांना धक्का, 'या' 4 कारणांमुळे बुडाले 5 लाख कोटी

व्यवहारादरम्यान, सेन्सेक्स एका वेळी सुमारे 1,400 अंकांनी घसरला
share market crashed today because of these factors falls tuts, share market down reason, Share Market today, Sensex Today, Share Market News Updates
share market crashed today because of these factors falls tuts, share market down reason, Share Market today, Sensex Today, Share Market News UpdatesSaam Tv
Published On

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे वाईट दिवस संपण्याचे नाव घेत नाहीत. गेल्या वर्षीच्या जबरदस्त तेजीनंतर जगभरातील शेअर बाजार (share market) अलीकडच्या काही महिन्यांपासून सुधारणेच्या स्थितीत आहे. विशेषत: विक्रमी चलनवाढीमुळे व्याजदर वाढवण्याचा काळ सुरू झाला आणि विक्रीचा वेग वाढला. आज गुरुवारच्या व्यवहारात, BSE सेन्सेक्स आणि NSE निफ्टी दोन्ही 2-2 टक्क्यांहून अधिक घसरले. त्यामुळे एका झटक्यात गुंतवणूकदारांचे मार्केटमधील (share market) 5 लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. (Share Market News Updates)

सर्वांगीण विक्री अशी होती, की सेन्सेक्समधील ३० कंपन्यांपैकी फक्त २ म्हणजे विप्रो आणि एचसीएल टेक ग्रीन झोनमध्ये राहू शकल्या. काही क्षणी तो सुमारे 1,400 अंकांपर्यंत घसरला. व्यवहार बंद झाल्यानंतर सेन्सेक्स (Sensex) 1,158.08 अंकांच्या (2.14 टक्के) घसरणीसह 52,930.31 अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे NSE निफ्टी 359.10 अंकांच्या (2.22 टक्के) घसरणीसह 15,808 अंकांवर बंद झाला. गेल्या 1 महिन्यात सेन्सेक्सने (Sensex) 5,500 अंकांची घसरण केली आहे. निफ्टीही गेल्या एका महिन्यात सुमारे 10 टक्क्यांनी घसरला आहे.

हे देखील पाहा-

आज बाजारात मोठ्या घसरणीची ही मुख्य कारणे (share market down reason)

अमेरिकेत महागाईचे नवीन आकडे जाहीर झाले आहेत. त्यानुसार एप्रिल महिन्यातील किरकोळ महागाईचा दर मार्चमधील 8.5 टक्क्यांवरून 8.3 टक्क्यांवर आला आहे. मात्र, हे प्रमाण ८.१ टक्क्यांच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. महागाई अजूनही जास्त असल्याने भीती वाढली आहे, फेडरल रिझर्व्ह दर वाढीमध्ये आक्रमक दृष्टिकोन स्वीकारू शकेल. त्यामुळे घाबरलेले गुंतवणूकदार विक्री करत आहेत.

अमेरिकन चलन डॉलर मजबूत होत आहे. सध्या सहा प्रमुख चलनात डॉलरचा निर्देशांक 103.92 वर पोहोचला आहे. डॉलरची ही जवळपास दोन दशकांतील सर्वोच्च पातळी आहे. डॉलरच्या या विक्रमी तेजीमुळे चलन बाजारात अस्थिरता दिसून येत आहे. या आठवड्यात भारतीय चलनाने डॉलरच्या तुलनेत सर्वकालीन नीचांकी पातळी गाठली. याचा शेअर बाजाराच्या विपरीत परिणाम होत आहे.

share market crashed today because of these factors falls tuts, share market down reason, Share Market today, Sensex Today, Share Market News Updates
राज्यसभेच्या 57 जागांसाठी निवडणूक जाहीर; 10 जून रोजी मतदान

काल अमेरिकन बाजारात घसरण झाली. डाऊ जोन्स औद्योगिक सरासरी 326.63 अंकांनी किंवा 1.02 टक्क्यांनी घसरली. S&P 500 1.65 टक्क्यांनी घसरला आणि Nasdaq Composite Index 3.18 टक्क्यांनी घसरला. यानंतर आज आशियाई बाजारही तोट्यात होते. जपानचा निक्केई 1.01 टक्क्यांनी, हाँगकाँगचा हँग सेंग 1.05 टक्क्यांनी आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.36 टक्क्यांनी घसरत बंद झाला.

विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार गेल्या काही महिन्यांपासून भारतीय बाजारपेठेत विक्री करत आहेत. प्राथमिक आकडेवारीनुसार, FPI ने बुधवारी 3,609.35 कोटी रुपयांची विक्री केली. अशा प्रकारे, मे महिन्यात, FPI ने भारतीय बाजारातून आतापर्यंत 17,403 कोटी रुपये काढले आहेत. या वर्षाबद्दल बोलायचे तर, 2022 मध्ये आतापर्यंत FPI 1,44,565 कोटी रुपयांची विक्री केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com