AKOLA DROUGHT MEETING saam tv
महाराष्ट्र

नांदेडनंतर अकोल्यात असंवेदनशीलतेचा कळस, कृषीमंत्र्यांसमोरच अधिकारी मोबाईलवर मश्गुल

Insensitivity in Akola Drought Meeting: नांदेडनंतर आता अकोल्यात दुष्काळावर घेतलेल्या बैठकीत जे काही घडलंय ते पाहून तुम्हाला चीड येईल. नेमकं काय घडलंय या बैठकीत?... विरोधक पुन्हा का आक्रमक झालेत?

Rohit Kadam

राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती असताना लोकप्रतिनिधींनंतर प्रशासनातील अधिकाऱ्यांना याचं गांभीर्य आहे का? असा प्रश्न पडावा. मराठवाड्यातील काजू-बदामच्या प्रकारानंतर अकोल्यात प्रशासनातील अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा पुन्हा एकदा समोर आलाय. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी अकोल्यात अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. मात्र, ही बैठक सुरू असताना अधिकारी मोबाईल खेळण्यात मश्गुल असल्याचं दिसलं...

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील ठाकरे सभागृहात झालेल्या आढावा बैठकीतील प्रकारावर विरोधकांनी संताप व्यक्त केलाय... तर दुसरीकडे, कृषीमंत्र्यांनी चौकशी करून कारवाई करणार असल्याची मोघम प्रतिक्रिया दिलीये...

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट आहे. खरीपाचा हंगाम हातचा गेल्याने बळीराजा रडकुंडीला आला आहे. आस्मानी संकटाने बळीराजा पिचलेला असतानाच यंत्रणेची असंवेदनशीलता चिड आणणारी आहे. एकीकडे काजू-बदामवर ताव मारणारे लोकप्रतिनिधी तर दुसरीकडे, मोबाईलमध्ये दंग असणाऱ्या अधिकाऱ्यांना पाहून खरंच, सरकारला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचं सोयर-सुतकं तरी आहे का?... असा प्रश्न उपस्थित होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

३५ वर्षीय अभिनेत्रीची देहविक्रीच्या रॅकेटमधून सुटका, ठाण्यातील घटनेनं इंडस्ट्रीत खळबळ

Mustard Oil: नाभीमध्ये मोहरीच्या तेलाचे २ थेंब सोडल्याने काय होते?

Bathing Tips : गरम, थंड की डेटॉलचे पाणी... त्वचेसाठी सर्वात बेस्ट कोणतं? वाचून थक्क व्हाल

Food Combination : वांगी आणि दही एकत्र खाताय? आरोग्याला होणारे 5 मोठे नुकसान जाणून घ्या

Flat Stomach Yoga: पोटाची चरबी कमी करून, सपाट पोट हवंय? तेही झटपट; मग, 'ही' 7 योगासनं ट्राय करा

SCROLL FOR NEXT