अकोला जिल्हा कोरोना लसीकरणात राज्यात पिछाडीवर Saam Tv
महाराष्ट्र

अकोला जिल्हा कोरोना लसीकरणात राज्यात पिछाडीवर

आतापर्यंत केवळ 54 टक्के लाभार्थ्यांनीच पहिला डोस पूर्ण केला असून 25 टक्के लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला आहे.

अॅड. जयेश गावंडे

अकोला - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला ग्रामीण भागातून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने अकोला जिल्ह्यात ही मोहीम पिछाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत केवळ 54 टक्के लाभार्थ्यांनीच पहिला डोस पूर्ण केला असून 25 टक्के लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. राज्यात संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी आरोग्य विभाग लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवित आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात या मोहिमेला थंड प्रतिसाद मिळत आहे.

हे देखील पहा -

सध्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. शेतीच्या कामाची लगबग यामुळे या मोहिमेला कमी प्रतिसाद मिळत आहे. अकोल्यात लाभार्थ्यांची संख्या 14 लाखांहून अधिक आहे. त्यामुळे 28 लाखाच्या वर डोस देण्याचे आव्हाहन मात्र जिल्ह्यात लसीचा मुबलक साठा असताना आतापर्यंत 11 लाख 15 हजाराहून अधिक लसीकरण झाले आहे. त्यामुळे लसीकरण वाढवण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याचे आव्हान प्रशासन करत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT