Akola Crime News Saam TV
महाराष्ट्र

Akola Crime News : लग्नाआधीच घरी आला होता भावी जावई; मुलीची आई बाहेर जाताच केलं भयानक कांड

Akola News : अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

अॅड. जयेश गावंडे

Akola Crime News : अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाआधीच भावी जावयाने मुलीला फूस लावून पळवून नेलं आहे. याप्रकरणी अकोट पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

काही दिवसांपूर्वी अकोट फैल (Akola News) भागात राहणाऱ्या तक्रारदार महिलेच्या मुलीचा अमरावती येथील एका तरुणासोबत साखरपुडा झाला होता. मात्र, मुलीचे वय कमी असल्याने त्यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये लग्न करण्याचे ठरवले. साखरपुडा झाला असल्याने या तरुणाचे तक्रारदार महिलेच्या मुलीसोबत फोनवर नियमित बोलणे व्हायचे. (Crime News)

दरम्यान, मुलीला बरे वाटत नसल्याने अमरावती येथील भावी जावई २५ मार्च रोजी मुलीला भेटण्यासाठी अकोट फैल येथे तिच्या घरी आला. जावई म्हणून सासूनेही आदरातिथ्य केले. सासूला काही काम असल्यामुळे ती बाहेर निघून गेली. घरी परतल्यावर भावी जावई आणि मुलगी दिसून आली नाही.

दोघेही बाहेर गेले असतील असा अंदाज तक्रारदार महिलेने बांधला. परंतु रात्री उशिरापर्यंत दोघेही परतले नाहीत. मुलीचा साखरपुडा झालेला असल्यामुळे या महिलेने सुरूवातीला याप्रकरणात पोलिसांकडे तक्रार दिली नाही. मात्र, बराच वेळ होऊनही मुलगी आणि भावी जावई घरी परत न आल्याने मुलीच्या आईला चिंता वाटू लागली.

तक्रारदार महिलेने मुलगी आणि भावी जावई दोघांनाही फोन केले. मात्र, त्यांचे फोन बंद येत होते. अखेर मुलीच्या आईने अकोट फैल पोलिस (Police) ठाण्यात भावी जावयाविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, दोघांचाही शोध सुरु केला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT