Akola Crime Saam tv
महाराष्ट्र

Akola Crime : उसनवारीच्या पैशावरून जोरदार राडा; अकोल्यात दोन गट भिडले, ९ जण जखमी

Akola News : अगोदरही दोन्ही गटात अनेकदा जुन्या कारणांवरुन वाद झाले होते. मात्र १२ मे रोजी रात्री देखील दोन्ही गटांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली.

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 
अकोला
: दोन गटात उसनवारीच्या पैशांवरून वाद आहे. दरम्यान रात्री कुत्रा भुंकल्याचे निमित्त होऊन दोन्ही गट पुन्हा आमनेसामने आले. (Akola) वाद एवढ्या विकोपाला गेला की थेट दोन्ही गटाकडून एकमेकांवर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. या वादानंतर काही काळ घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच (Police) पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी दोन्ही गटाला पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली.

अकोला शहरातल्या खदान परिसरातील शासकीय गोदामाच्या पाठीमागील जेतवन नगर परिसरात हा वाद झाला. या (Crime News) अगोदरही दोन्ही गटात अनेकदा जुन्या कारणांवरुन वाद झाले होते. मात्र १२ मे रोजी रात्री देखील दोन्ही गटांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. या हाणामारीत धारदार शास्त्राने देखील वार करण्यात आले. या प्रकरणात (Akola Police) खदान पोलीस स्टेशन येथे जिवघेणा हल्ला प्रकरणी तसेच विविध कलमान्वये आणि ऍट्रॉसिटीनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस अधिकारी एसीपी कुळकर्णी हे करीत आहेत. 

पोलिसांच्या माहितीनुसार उसनवारीच्या पैशावरून हा वाद झाल्याचे समजत आहे. या घटनेत दोन्ही गटातील ९ जण जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान या सर्वांवर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. रात्री याप्रकरणी परस्पर दिलेल्या तक्रारीवरून अनेक जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सद्यस्थितीत दोन्ही गटातले प्रत्येकी तीन- तीन लोकांना ताब्यात घेतले असून याचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: हाजीर हो! राहुल गांधींच्या अडचणी वाढणार, सावरकरांच्या बदनामी प्रकरणात न्यायालयाचं समन्स

Uddhav Thackeray : मुंबईवर घाला घातला तर हम काटेंगे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल,VIDEO

Watch Video: पावले धरती परतीची वाट! अरं 'देवा' भाऊच्या सभेकडे बहिणींनी फिरवली पाठ

Kolhapur Politics : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा प्रकार; कोल्हापुरात प्रचार पत्रकावर तांदूळ, कापलेला लिंबू, अंगारा

Inflation: महागाई कमी होणार? नेटकऱ्याच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

SCROLL FOR NEXT