Pune Crime news  Saam Tv
महाराष्ट्र

Akola City News : सासरच्यांकडून विवाहितेचा अमानुष छळ; तक्रारीनंतर संतापजनक कारण आलं समोर

पती आणि सासूने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यास सुरुवात केली.

जयेश गावंडे

Akola Crime News : स्त्री-पुरुष समानता ही अनेक ठिकाणी अजूनही फक्त बोलण्याची गोष्ट राहिली आहे. आजही काही घरांमध्ये स्त्रीयांवरील अन्यायाचे प्रमाण कायम आहे. अकोला येथे अशीच एक संतापजनक घटना घडली आहे. पत्नीला मुलगी झाल्याने सासरच्या मंडळींकडून तिचा अमानुष छळ करण्यात आला आहे. (Latest Akola Crime News)

आम्हाला मुलगा पाहिजे होता, मात्र तुला मुलगीच झाली. तुझ्या वडिलांनी लग्नात हुंडा कमी दिला. यासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या ६ जणांविरुद्ध अकोल्यातील सिव्हील लाइन पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

शास्त्री नगर येथे राहणाऱ्या २९ वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचे लग्न जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील विटवे गावातील जनार्धन रामुजी कचरे यांचा मुलगा संदीप याच्यासोबत २०१७ मध्ये झाले. दरम्यान गरोदर राहिल्यावर विवाहितेला सासू सुनंदा कचरे हिने आम्हाला मुलगा पाहिजे,असे म्हणत सर्व प्रकारच्या तपासण्या करुन घेतल्या.

त्यानंतर मुलगी झाल्याने, पती संदीप कचरे व सासूने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. यासह अनेक कारणावरुन पती व सासरची मंडळी विवाहितेला मारहाण करुन शिवीगाळ करायचे. नुकत्याच जन्मलेल्या मुलीचाही तिटकार करत होते. या सर्व त्रासाला कंटाळून अखेर महिलेने पोलिसांत धाव घेतली आहे. पोलिसांनी आता सासरच्या मंडळींच्या चांगल्याच मुसक्या आवळल्यात.

मुलगा पाहिजे यासाठी अनेक व्यक्ती आधिच गर्भतपासणी करतात. मुलगी असल्यास गर्भपात केला जातो. अन्यथा मुलगी जन्माला आल्यावर अर्भक रस्त्यावर किंवा कचऱ्याच्या डब्यात टाकून देणाऱ्याही अनेक क्रूर मानसिकतेच्या व्यक्ती आहेत. ४ दिवसांपूर्वी उल्हासनगर येथील नदीपात्राजवळ कुजलेल्या अवस्थेत स्त्री जातीचं अभ्रक आढळून आलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apurva Gore: अपूर्वा गोरेचं सुंदर सौंदर्य, फोटो पाहा

Maharashtra News Live Updates: संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला, कारण गुलदस्त्यात

Nashik News : नाशिकमध्ये मविआमध्ये बिघाडीची शक्यता; काँग्रेसने घेतला मोठा निर्णय

VIDEO : कुठे ५ कोटी, तर कुठे १.५ कोटी; राज्यात विधानसभा निवडणुकीत पैशांचा अक्षरश: पाऊस !

Health Benefits Of Bananas: डाएट मध्ये केळी खाण्याचे 'हे' आहेत आश्चर्यकारक फायदे

SCROLL FOR NEXT