Akola Crime Saam Tv
महाराष्ट्र

Akola: नगरसेवकपदाच्या उमेदवाराच्या नवऱ्यावर जीवघेणा हल्ला, मॉर्निग वॉकला गेले असता चाकूने सपासप वार

Political Tension in Akola: अकोल्यामध्ये नगरसेवकपदाच्या उमेदवाराच्या नवऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. एमआयएमच्या महिला उमेदवार उज्वला तेलगोटे यांच्या नवऱ्यावर तिघांनी हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Priya More

Summary -

  • अकोटमध्ये उमेदवाराच्या नवऱ्यावर जीवघेणा हल्ला झाला

  • मॉर्निंग वॉकदरम्यान तिघांनी चाकूने हल्ला केला

  • हल्ल्यात जखमी झालेल्या राजेश तेलगोटे यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

  • घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला

अकोल्यातील राजकारण तापायला सुरूवात झाली आहे. अकोल्यातील नगरसेवकपदाच्या उमेदवाराच्या नवऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. मॉर्निंग वॉकसाठी गेले असतान ३ जणांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात एमआयएमच्या उमेदवाराचा नवरा गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर सध्या अकोट ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेच्या प्रभाग १५ च्या नगरसेवकपदाच्या एमआयएमच्या उमेदवार उज्वला तेलगोटे यांच्या नवऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. मॉर्निंग वॉकला गेले असता त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या हल्ल्यात राजेश तेलगोटे गंभीर जखमी झाले आहेत. मॉर्निंग वापरून घरी परत येत असताना तीन जणांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.

या हल्ल्यात राजेश तेलगोटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर अकोटच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्याची माहिती समजताच तेलगोटे यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली. दरम्यान याप्रकरणी अकोट शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या घटनेमुळे अकोल्यात मोठी खळबळ उडाली आहे. राजकीय वादातून तेलगोटे यांच्यावर हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. आज नगरपालिका प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. दिवसाच्या सुरुवातीलाच हा हल्ला झाल्याने पोलिसांची धावपळ झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! आईने चाकूने मुलाचा गळा चिरला, मुलीवरही सपासप वार

Gold Rate Today : खरेदीआधी वाचा सोन्याचे ताजे दर, २२k, २४k गोल्ड प्रति तोळा किती स्वस्त? वाचा एका क्लिकवर..

Maharashtra Live News Update: केडीएमसीत हालचालींना वेग; भाजपचे ५० नगरसेवक कोकण भवनाकडे होणार रवाना

Pune-Solapur Highway: पुणे-सोलापूर प्रवास सुसाट होणार, ६ उड्डाणपूल अन् 'या' ठिकाणी होणार सर्व्हिस रोड, वाचा मास्टरप्लॅन

Sabudana Papad : घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि क्रिस्पी साबुदाणा पापड, लगेच नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT