अकोल्यात एका तरुणाने मूकबधिर मुलीवर राहत्या घरात विनयभंगाचा प्रयत्न केला.
आरोपीने मुलीचे तोंड दाबून गळा दाबला, पण ती पळून जाऊन सुटली.
पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
अक्षय गवळी, साम टीव्ही, प्रतिनिधी
Akola Crime : महाराष्ट्राच्या अकोला जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर येत आहे. अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच आता मूकबधिर मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला. शेजारील राहणाऱ्या 38 वर्षीय तरुणाने मूकबधिर मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीतील मोठी उमरी परिसरात ही घटना घडली. या घटनेनंतर मूकबधिर मुलगी आणि तिची आई मानसिक तणावात आहे. विशेष, मायलेकी दोघेही मूकबधिर आहेत. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला गजाआड केलंय.
गणेश विसर्जनाच्या दिवशी अकोल्यात एक दुःखद घटना घडली होती. डाबकी रोड भागात हिंदू समाजातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली. विरोधी पक्षांच्या आमदारांसह सत्ताधाऱ्यांनी या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. तर 'सकल हिंदू समाज' देखील आक्रमक होता. घटनेच्या निषेधार्थ भव्य असा 'हिंदु जन आक्रोश' मोर्चा काढण्यात आला. हजारो संख्येने महिला पुरुष या मोर्चात सहभागी झाले होते. हे प्रकरण ताज असतानाच आता मूकबधिर मुलीवर तिच्या राहत्या घरात अत्याचाराचा प्रयत्न अर्थातच विनयभंग करण्यात आला. शहरातल्या मोठी उमरी भागातील 40 कॉटर परिसरात ही घटना घडली. नितीन रामकृष्ण खंडारे (वय 38 वर्ष) असं मूकबधिर मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाचं नाव आहे.
नेमकं काय घडलं होतं?
तारीख 10 सप्टेंबर, नितीन खंडारे हा पीडित मुलीच्या राहत्या घरात शिरला, यादरम्यान मायलेकी गाढ झोपलेल्या होते. यावेळी त्याने मूकबधिर असलेल्या मुलीच्या जवळील रुमालाने तिचं तोंड दाबलं. त्यानंतर घराचा दरवाजा आणि खिडक्या बंद करून घेतल्या. तसेच तिचा गळा देखील दाबला. त्यानंतर तिचा श्वास गुदमरला, ती घाबरली. तिने तोंडावरील रुमाल काढून फेकला, लागलीच दरवाजा उघडून घराबाहेर पळत सुटली. त्याचवेळी खंडारे देखील घरातून पळ काढला. त्यानंतर मूकबधिर मुलीने खानाखुणा करून नातेवाईकांना संपूर्ण घडलेला प्रकार सांगितला. अशा तक्रारीवरून सिव्हिल लाईन पोलिसांनी नितीन खंडारे विरुद्ध 74, 75 (1), 333 या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास 'पोलीस उपनिरीक्षक निकम' करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.