ACB Akola Saam Tv
महाराष्ट्र

वाळूच्या व्यवसायासाठी मागितला हप्ता; लाचखोर नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आज तहसीलदार याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

अॅड. जयेश गावंडे

अकोला - अकोट मध्ये एका लाचखोर नायब तहसीलदाराला अकोला (Akola) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ अटक (Arrest) केली आहे. हरीश गुरव असे लाचखोर तहसीलदाराचे नाव आहे. वाळूचा व्यवसाय नियमित चालू ठेवण्यासाठी हप्ता म्हणून 8 हजाराची लाच (Bribe) स्वीकारण्यात आली होती. ही कारवाई रात्री नगरपालिकेच्या दालनात करण्यात आली. तहसीलदार हरीश गुरव याच्याकडे अकोट नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदाचा प्रभारही आहे. वाळू व्यवसाय करणाऱ्याला हरीश गुरव याने दहा हजार रुपये हप्ता मागितला. हप्ता दिल्यानंतर कोणतीही कारवाई होणार नाही, अशी ग्वाही त्याने दिली होती.

हे देखील पाहा -

त्यानंतर तडजोडीअंती आठ हजार रुपये हप्ता देण्याचे ठरले होते. मात्र नियमानुसार वाळू वाहतुकीचा व्यवसाय करत असताना आपल्याला लाच देणे शक्य नसल्या कारणाने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पंचासमक्ष पडताळणी केली असता गुरव याने लाच मागितल्याचे समोर आले. त्यानंतर रात्री पावणेआठ वाजताच्या दरम्यान अकोट नगरपालिकेत सापळा लावण्यात आला आणि यामध्ये तहसीलदार गुरव हा लाच स्वीकारताना रंगेहाथ सापडला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आज तहसीलदार याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devshayani Ekadashi: देवशयनी एकादशीचं काय आहे महत्त्वं? जाणून घ्या पूजेची योग्य वेळ

Satara Crime : घरकाम करणाऱ्या महिलेने मारला डल्ला; दहा तोळे सोने लांबवीले, महिलेला पोलिसांनी केली अटक

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Asteroid Scare : कुतुबमिनारपेक्षा ९ पट मोठा लघुग्रह पृथ्वीवर धडकणार | VIDEO

GK: जुन्या रेल्वे डब्यांचा वापर रेल्वे कसा आणि कुठे करते? जाणून घ्या सर्व माहिती

SCROLL FOR NEXT