Akola news today  Saam
महाराष्ट्र

अकोल्यात पुन्हा राडा, काँग्रेस नगरसेवकावर हल्ला, कारच्या काचा फोडल्या

Akola news today : अकोल्यात काँग्रेस नगरसेवक आकाश कवडे यांच्या कारची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. डाबकी रोड परिसरात घडलेल्या या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

Akola Congress corporator car vandalism news : अकोल्यात काँग्रेसच्या नगरसेवकाच्या वाहनाच्या काचा फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. काही अज्ञातांनी नगरसेवकाच्या कारच्या पाठीमागील काचा फोडल्या आहेत. काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक आकाश कवडे यांच्या वाहनाच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे.. आकाश कवडे हे काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक, युवक काँग्रेस प्रदेशचे उपाध्यक्ष आणि अकोल्याचे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. (Akash Kawade attack incident details)

अकोला शहरातील डाबकी रोड पोलीस स्टेशन अंतर्गत आकाश कवडे राहत असून ज्यावेळी घटना घडली त्यावेळी आकाश कवडे हे घरातचं होते. दरम्यान हल्लेखोरांची ओळख अजून पटली नाही. या प्रकरणात पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

घरासमोर उभी असलेल्या कारच्या काचा अज्ञातांनी फोडल्याची माहिती काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना समजतात त्यांच्या घरासमोर मोठी गर्दी जमलीये.. वाहनांच्या काचा फोडणाऱ्यांचा शोध घेऊन तात्काळ त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता काँग्रेस पक्षाकडून होत आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: आजचा दिवस ठरवेल तुमचं नशीब! या 5 राशींना मिळणार मोठी खुशखबर; सोमवारचे खास राशीभविष्य

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

SCROLL FOR NEXT