akola  saam tv
महाराष्ट्र

Akola News : अकोल्यात दगडफेक आणि वाहनाची जाळपोळ; दोन गटात तुफान राडा, एकाची प्रकृती चिंताजनक

Akola Latest News : अकोल्यात दगडफेक आणि वाहनाची जाळपोळ झाल्याची घटना घडली आहे. दोन गटात राडा झाल्यानंतर ही घटना घडली. या घटनेनंतर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.

Vishal Gangurde

अक्षय गवळी, साम टीव्ही

अकोला जिल्ह्यातील बाळापुरात तालुक्यातील हातरुन गावातून मोठी बातमी हाती आली आहे. या गावात एकाच समाजाच्या दोन गटात मोठा राडा झाल्याची घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावरून दोन गटात वाद उफाळल्याची घटना घडली आहे. वादानंतर दोन गट आमने-सामने आले. त्यानंतर दोन्ही गटात दगडफेक झाल्याची घटना घडली. यावेळी चारचाकी वाहन पेटवण्यात आल्याचीही घटना घडली आहे.

अकोल्यात दोन गटात वाद पेटल्यानंतर एका गटाने चारचाकी वाहन पेटवल्याची घटना घडली आहे. या घटनेत चार जण जखमी झाले आहेत. तर दोन्ही गटातील काही व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहेत. या घटनेतील ६ जखमींवर अकोल्याच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. हातरून गावात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

अकोला जिल्ह्यातील हातरुन गावात एकाच समुदायातील दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. आज सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलिसांत आपल्या विरोधात तक्रार दिल्याच्या संशयावरून एका गटातील काही जणांनी दुसऱ्या गटावर हल्ला चढवला. यानंतर दोन्ही गटामध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. यामध्ये एका वाहनाची जाळपोळ करण्यात आली आहे.

अकोल्यातील या घटनेत सुमारे ६ जण जखमी झाल्याचे समजते आहे. घटनेतील जखमींवर अकोल्यातल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. यामध्ये एका जखमी व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर हातरून गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणातं तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेलची बचत करा, सोनं खरेदी करू नका; मोदींच्या आवाहनावर महाराष्ट्राचा कौल काय? मुंबई-पुण्यासह, नागपूरकरांची भूमिका स्पष्ट

Shani Jayanti 2026: शनी जयंतीला होणार बुध-शुक्राचं गोचर; या राशींना मिळणार पैसाच पैसा

Maharashtra News Live Update: जमिनीचे तुकडे मंजुरीशिवाय विकता येणार नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

मुलीच्या हळदीत वडिलाचं हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू; लग्न घरावर कोसळला दुःखाचा डोंगर

Work From Home Jobs For Women: महिलांसाठी वर्क फ्रॉम होम जॉब्स, घरबसल्या झटक्यात कमवा लाखो रूपये

SCROLL FOR NEXT