Akola News Saam Tv
महाराष्ट्र

दुर्दैवी! अकोल्यात जीर्ण झालेल्या प्रवासी निवाऱ्याने घेतला युवकाची बळी

जिल्ह्यातील प्रवाशी निवारे मोजत आहेत शेवटच्या घटका

अॅड. जयेश गावंडे

अकोला - बार्शीटाकळी तालुक्यातल्या जमकेश्वर येथे जीर्ण झालेल्या प्रवाशी निवाऱ्याची छत अंगावर पडून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विकी कोकरे असं या मृतक युवकाचे नाव आहे. अकोला (Akola) जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रवाशांच्या सोयीसाठी बांधलेले प्रवाशी निवारे शेवटच्या घटका मोजत असून या जीर्ण झालेल्या प्रवाशी निवाऱ्यांकडे लोकप्रतिनिधी सह प्रशासनाच्या कोणाचेही लक्ष नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे.

कारण याच जीर्ण प्रवाशी निवाऱ्यामुळे एका बावीस वर्षीय युवकाला आपला जीव गमवावा लागला आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील जमकेश्वर येथील प्रवासी निवा-यात येथीलच विकी वसंत कोकरे वय अंदाजे (22) वर्ष हा मोबाईल बोलत असताना अचानकपणे पुर्ण स्लॅब कोसळला आणि तो त्याखाली दबला यातच या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हे देखील पाहा -

दरम्यान याची माहीती पिंजर मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ रेस्क्यु ऑपरेशनसाठी पाचारण केले दरम्यान पथकाने युवकाचा मृतदेह मलब्याखालून बाहेर काढला आहे.

जिल्ह्यातील प्रवाशी निवारे मोजत आहेत शेवटच्या घटका-

जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी स्थानिक आमदार यांच्या निधीतून प्रवाशी निवाऱ्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून बांधकाम करण्यात आलेले प्रवाशी निवारे हे आता शेवटच्या घटका मोजत आहेत. त्यामुळे हे प्रवाशी निवारे तितकेच धोकादायक बनले आहेत. या निवाऱ्यांकडे ना कुन्या लोकप्रतिनिधीचे लक्ष आहे ना प्रशासनाचे त्यामुळे या प्रवाशी निवाऱ्याखाली आसरा घेताना जरा सावधच रहा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भयंकर! रेल्वेची स्कूल बसला जबर धडक, ३ चिमुकल्यांचा जागीच मृत्यू, अनेकजण जखमी

Sonalee Kulkarni : कुण्या गावाचं आलं पाखरू; सोनालीच्या सौंदर्याने केलाय कहर, पाहा PHOTOS

Parbhani: ३ भावांची आदर्श वाटणी! २ शिक्षक भावांनी तिसर्‍याला सर्वकाही दिले, वडिलांच्याही डोळ्यात पाणी

Mira Bhayandar: महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी शिका, मुस्लिम बांधवाचा सल्ला|VIDEO

Nagpur: कुत्र्याला पाहून घाबरला, पळताना ५ व्या मजल्यावरून पडला; १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT