Akola News Saam tv
महाराष्ट्र

Akola News : मुख्याध्यापकाचा त्रास; कंटाळून भाजप नेत्याच्या मुलीने उचलले उपोषणाचे हत्यार

Akola Akot News : मुख्याध्यापक भूषण ठाकूर यांच्याविरुद्ध अकोट शहर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गुन्हा दाखल झाला तरी अद्यापपर्यंत अटकेची कारवाई झाली नाही असा आरोप उपोषणकर्त्या तरुणीने केला

Rajesh Sonwane

अक्षय गवळी
अकोला
: मुख्याध्यापकांच्या त्रासाला कंटाळून अकोला जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर भाजप नेत्याच्या मुलीने बेमुदत उपोषण सुरू केले आहे. भाजप सरकारच्या काळातच भाजप नेत्याच्या मुलीला बेमुदत उपोषणाला बसण्याची वेळ येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे; असा सवालही यावेळी उपस्थित केला जात आहे. 

अकोला जिल्ह्यातील भाजपचे सरचिटणीस तथा जिल्हा परिषदचे माजी सभापती यांच्या शिक्षक मुलीने हे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. अकोट येथील सरस्वती विद्यालयावर शिक्षिका म्हणून असलेल्या या तरुणीला शाळेतील मुख्याध्यापकाने शरीर सुखाची मागणी केली होती. मागील काही दिवसापासून आपल्याला मानसिक त्रास देत असल्याचा आरोप या तरुणीने केला आहे. 

सदर प्रकरणात मुख्याध्यापक भूषण ठाकूर यांच्याविरुद्ध अकोट शहर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र गुन्हा दाखल झाला असला तरी अद्यापपर्यंत त्याच्यावर कुठलेही अटकेची कारवाई झाली नाही; असा आरोप उपोषणकर्त्या तरुणीने केला आहे. त्यामुळे मुख्याध्यापक भूषण ठाकूर यांच्यावर कारवाई करत तात्काळ त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. या मागणीसाठी तरुणीने उपोषण सुरू केले आहे. 

दुसरीकडे उपोषणकर्त्या शिक्षिकेविरूद्धही मुख्याध्यापक भूषण ठाकूर यांच्या पत्नीने ब्लॅकमेलींगची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकरणातील गुन्ह्यांमध्ये सत्य बाहेर काढण्याचं काम अकोट पोलिसांना आता करावं लागणार आहे. मात्र, मुख्याध्यापकांविरुद्धच शिक्षिकेने आंदोलन सुरू केल्याने अकोला जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता हे प्रकरण कुठल्या स्तरावर जातंये हे पाहणे महत्त्वाचं असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT