Mine owners in Akola allege bribery demand by ADM Promod Gaikwad as audio clip emerges; official denies all charges. Saam Tv
महाराष्ट्र

खाण व्यवसायासाठी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी मागितली लाच; ऑडिओ क्लिप व्हायरल, प्रशासनात खळबळ

Akola ADM Bribery Allegations Audio Clip Truth: अकोल्यातील अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर खाण मालकांनी पैसे मागितल्याचा गंभीर आरोप केला असून या प्रकरणात ऑडिओ क्लिपही समोर आली आहे.

Omkar Sonawane

अक्षय गवळी, साम टीव्ही

अकोल्याचे अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर जिल्ह्यातील काही खाण मालकांनी केलेल्या आरोपामुळे मोठी खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील गिट्टी आणि दगड खाणी सुरू ठेवण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी पैसे मागत असल्याचा गंभीर आरोप या खाण मालकांनी केलाय. यासंदर्भात ऑडिओ क्लिप्स त्यांनी पुरावे म्हणून समोर केल्या. एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये खानमालकांनी तक्रार दाखल केली. मात्र, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांनी हे सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत.

अकोल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड अडचणीत येण्याची चिन्ह आहेत. याला कारण ठरलंय त्यांच्यावर काही खाण मालकांनी केलेल्या पैशांच्या मागणीच्या आरोपाचं. अकोला जिल्ह्यात गौण खनिजाच्या जवळपास 70 खाणी आहे. या खाणींमध्ये दगड, गिट्टी, क्रशर आणि मुरूम खाणींचा समावेश आहे. या खाणी सुरू ठेवण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी गायकवाड यांनी प्रत्येकी 15 हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप खाण मालकांनी केला.

यासंदर्भात पैशाची मागणी केलेल्या खानमालकांनी अकोल्यातील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गायकवाड यांच्याविरोधात तक्रार केलीये. पोलिसांनी या तक्रारीच्या अनुषंगाने आता तपास सुरू केला आहेय. मात्र, या प्रकरणी अद्यापर्यंत कोणताही गुन्हा दाखल नाहीय. गायकवाड यांनी पैशांची मागणी केल्याचा पुरावा म्हणून या खाण मालकांनी एक ऑडिओ क्लिप समोर केली.

अकोल्याचे अप्पर जिल्हाधिकारी राहुल गायकवाड आणि खाणमालक विवेक बिजवे यांच्यातील संभाषण (साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही)

बिजवे : हॅलो...

# गायकवाड : बिजवे साहेब काय चाललंये.

# बिजवे : आराम सुरु आहे, बोला साहेब!

# गायकवाड : काहीच नाही शून्यचं विषय झाला आपला, एक महिना झाला.

# बिजवे : आम्ही बार्शीटाकळीचे टार्गेट केलं, तहसीलदारांचा धन्यवादचा मॅसेज पण आला.

# गायकवाड : हो चालेल, व्हेरी गुड.

# बिजवे : सलग तीन दिवस फिरून सर्वांकडून पैसे गोळा केले..

# गायकवाड : चांगली गोष्ट आहे, चालेल!

# बिजवे : हो..

# गायकवाड : मी सुरुवातीला काय म्हटलं तुम्ही ऐकलंचं नाही, तरीही तुम्ही उत्तर द्यायला सुरुवात केली.

# बिजवे : हो साहेब....

# गायकवाड : मी काय म्हणतो तुम्हाला, तुम्ही क्वार्टरला आले होते.

# बिजवे : हो साहेब.

# गायकवाड : बर काय मग शून्यच विषय झाला ना.

# बिजवे : साहेब दोन ते आठ दिवस होऊ द्या, माणसं शांत होतात मारू चक्कर, करतो मग ते. आणू तेही लाईनवर साहेब!

# गायकवाड : तुम्हाला आता कधीच बोलणार नाही, बघू आता.

# बिजवे : साहेब घरी पाहुणे आहेत, बसलो आहे.

# गायकवाड : एवढ आग्रह करण्याचं काहीच कारण नव्हत. मी चार ते पाच फोन केले तुम्हाला.

# बिजवे : हो..

# गायकवाड : तुम्ही चांगलं काम केलं, चांगली गोष्ट आहे. त्याबद्दल दुमत नाही आणि म्हणायचं नाही. यापुढे कुठल्या ही गोष्टीसाठी माझ्याकडे येऊ नका.

# बिजवे : साहेब असं काही....

# गायकवाड : कारण, मला खेदाने बोलावं लागत. म्हणून यापुढे माझ्याकडे येऊ नका. आता बघूच आपण. तुम्ही बघू, DMO बघू, जे आहेत ना 42 ते 47 लोक सर्व जण बघू.

# बिजवे : साहेब आता येऊन भेटतो तुम्हाला.

# गायकवाड : काहीच आवश्यकता नाही, थँक्यू व्हेरी मच...

माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. आपण कोणतीही पैशांची मागणी या लोकांना केलेली नाही. मी या सर्वांना वारंवार त्यांच्या कामात मदत केली. यावर्षीच्या आर्थिक वर्षात खणीकर्म विभागाकडून 130 कोटींचा महसुल लक्षांक ठेवलं होत. यातील फक्त 60 कोटी रुपये वसूल झाले होते. त्यामुळे 15 मार्चला मी एक बैठक घेऊन जास्तीत जास्त वसुलीसाठी या सर्वांना मदत करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतरही 30 मार्चच्या आसपास मी परत एक बैठक घेतली होती. मी या सर्वांना रॉयल्टीचे पैसे लवकरात लवकर भरण्याच्यासाठी आवाहन केलं होतं. मी पैसे नव्हे तर रॉयल्टीचे पैसे भरण्यासाठी या सर्व खाण मालकांना विनंती केली होती. त्यामुळे त्यांनी माझ्यावर असे आरोप का करावेत हे मला माहित नाही. माझ्यावरचे सर्व आरोप चुकीचे आणि बिनबुडाचे आहेत.असे म्हणत अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

SCROLL FOR NEXT