Akola : गरिबांचा घास काळ्या बाजारात विक्रीसाठी; तब्बल सहाशे क्विंटल गहू जप्त! जयेश गावंडे
महाराष्ट्र

Akola : गरिबांचा घास काळ्या बाजारात विक्रीसाठी; तब्बल सहाशे क्विंटल गहू जप्त!

गोरगरिबांना शासनाच्या सार्वजनिक धान्य वितरण प्रणाली मार्फत देण्यात येणारा ६०० क्विंटल गहू खामगाव येथून हैदराबाद येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असताना पोलिसांनी जप्त केला आहे.

जयेश गावंडे

अकोला : गोरगरिबांना शासनाच्या सार्वजनिक धान्य वितरण प्रणाली मार्फत देण्यात येणारा ६०० क्विंटल गहू खामगाव येथून हैदराबाद येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असताना पोलिसांनी जप्त केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात सरकारी रेशनचा गहू पकडल्याने रेशन माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विशेष पथकाला खबऱ्या मार्फत गोपनीय माहिती मिळाली की, खामगाव येथून शासकीय रेशनचा गहू काळ्याबाजारात विक्रीसाठी जात आहे.

हे देखील पहा :

प्राप्त माहिती वरून पोलीस निरीक्षक पाटील आणि त्यांच्या चमूतील कर्मचारी यांनी, बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या, राष्ट्रीय महामार्गावरील साई ढाबा येथे नाकाबंदी करून, खामगावच्या दिशेने येणाऱ्या AP-20,TB-4699 क्रमांक असलेल्या ट्रकला थांबवून, झडती घेतली असता,सदर ट्रक मध्ये सरकारी रेशनच्या गव्हाची ६०० पोते त्याचे वजन ३० टन आहे. सदर गहू कोणाचा आहे, कुठे नेण्यात येत आहे, याबाबत ट्रक चालकाला विचारपूस केली असता, सुरवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यावर, हा गहू शासकीय रेशनचा असून, तो गहू तेलंगणा राज्यात हैदराबाद येथे विक्रीसाठी जात असल्याचे त्याने सांगितले.

यावरून ट्रक चालक शेख जावेद ख्वाजा वय २८ वर्षे, रा.भंगारी पुरा, आदीलाबाद तेलंगणा राज्य, याला अटक करून, त्याच्याकडून ६ लाख रुपयांचा ३० टन गहू, २० लाख रुपये किंमतीचा ट्रक असा एकूण २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ट्रक चालकाविरोधात बाळापूर पोलीस ठाण्यात, भारतीय जीवनावश्यक अधिनियम च्या कलम 3,7 कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या या रेशनचा मालक कोण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या विशेष पथकाने केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : भाजपला विनंती, उद्धव ठाकरे म्हणाले मी बोलणी करायला तयार

Kitchen tips: हात खराब न करता चपातीचं पीठ कसं भिजवाल? पाहा एक सोपा देसी जुगाड

Ram-Leela Movie: रामलीला चित्रपटासाठी दीपिका पदुकोण नव्हती पहिली पसंती; तर या प्रसिद्ध अभिनेत्रीला  करण्यात आला होता रोल ऑफर...

Bajarang Sonawane : बीड जिल्ह्यात लोकसभेची पुनरावृत्ती निश्चित; खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला विश्वास

Bank Job: इंडियन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी भरती सुरु, पगार किती? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT