Ajit Pawar saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar: "पुन्हा परिवर्तन होऊ शकतं" अजित पवारांच्या या विधानाचा नेमका अर्थ काय?

Ajit Pawar: निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल यायचा आहे, काहीही घडू शकतं, असं विधान अजित पवार यांनी केलं आहे.

Chandrakant Jagtap

Ajit Pawar: पुण्यात आज कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल यायचा आहे, काहीही घडू शकतं, असं यावेळी अजित पवार म्हणाले. तसेच पुन्हा परिवर्तन होऊ शकतं याची आठवण सगळ्यांनी ठेवा असं सूचक विधान देखील त्यांनी यावेली केलं.

अजित पवार म्हणाले, सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणीही जन्माला आलं नाही. शिंदे-फडणवीस यांनी रडीचा डाव केला गद्दरी केली, पण हे राज्याला परवडणारं नाही. महापालिकेत देखील सगळे एकत्र बसून जागा वाटप करु, कुणावरही अन्याय होणार नाही. कारण नसताना मतदार संघात वाद घालू नका. महाविकास आघाडी हा एक परिवार आहे, असा विश्वास यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. (Latest Marathi News)

दाभेकरांचे मानले आभार

यावेळी अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याबद्दल अजित पवारांनी दाभेकर यांचे देखील कौतुक केले. 'बाळासाहेब दाभेकर यांचे देखील आभार मानतो, राहुल गांधी यांच्या फोनला सक्रिय प्रतिसाद दिला', असे पवार म्हणाले. (Maharashtra Political News)

नवीन राज्यपालांचे स्वागत

अजित पवार यांनी कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना नवीन राज्यपाल रमेश बैस यांचं स्वागत केलं. राज्यपाल पदाची परंपरा पहिल्यापासून चालत आली आहे, ते तसेच काम करतील त्यांना शुभेच्छा देतो, असे अजित पवार म्हणाले. तसेच आगोदरच्या राज्यपालांबद्दल घडलं ते सर्वांनाच माहिती आहे. आपल्या महापुरुषांबद्दल आपल्याला अभिमान आहे. त्याच्याबद्दल बोलायच काम चाललं होतं. याबद्दल आम्ही सगळ्यानी मुबंईत मोर्चा काढला होता. त्यांना जायचं होतं म्हणून ते असं काही करत होते का? असही अजित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर घटनेनंतर अंबरनाथ-बदलापूरमध्ये संताप; आरोपीला फाशीची मागणी

SSC Result 2026: दहावीचा निकाल २ टक्क्यांनी घसरला, पाहा मुंबई पुण्यासह ९ विभागाचा किती टक्के निकाल?

Raja Shivaji Box Office Collection: रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा धुमाकूळ, 7व्या दिवशीही कमावले तब्बल इतके कोटी

'Raja Shivaji' च नाही तर बॉलिवूडमधील 'या' चित्रपटांचे शुटिंग झालंय साताऱ्यात, पाहा ठिकाणाची यादी

SSC Result 2026 : महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर! यंदाही मुलींनीच मारली बाजी; पाहा तुमच्या जिल्ह्याचा निकाल

SCROLL FOR NEXT